भुयारी गटारीच्या निविदा ठरणार "पोकळ' 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 17 मे 2018

जळगाव, ता. 16 : शहरातील भुयारी गटारीच्या निविदा तंत्रज्ञानाच्या वादात अडकल्या आहेत. शासनाने आपला हेका कायम ठेवत निविदा प्रसिद्ध केल्या आहेत, तर दुसरीकडे महापालिकेनेही त्या रद्द करण्याची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे या निविदांची प्रक्रिया पुढे गेली तरी महासभेत त्या नाकारण्याचा पवित्रा महापालिकेने घेतला तर ही निविदा प्रक्रिया "पोकळ' ठरण्याचीच शक्‍यता आहे. 

जळगावात भुयारी गटारी बांधण्यासाठी जळगाव महापालिकेने नवीन "एसबीआर' तंत्रज्ञानाची मागणी केली आहे. मात्र शासन जुन्या "एमएमबीआर' तंत्रज्ञानावर ठाम आहे. मंत्रालयातील नगरविकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी आपला हेका कायम ठेवत जुन्याच "एमएमबीआर' तंत्रज्ञानाने काम करण्याच्या निविदा प्रसिद्ध केल्या आहेत. त्यातील एक निविदा मंजूरही होईल. काम मात्र सुरू होण्याची शक्‍यता कमीच आहे. 

"मनपा'चा विरोध कायम 
शासनाने निविदा मंजुरी केली तरी त्याला महापालिका मंजुरी देणार नसल्याचे सांगण्यात येत आहे. शहरातील कामासाठी शासनाने मंजूर केलेल्या निविदेस महासभेत किंवा स्थायी सभेत मंजुरी घ्यावी लागते, त्यानंतरच कामास प्रारंभ होतो. जुन्या तंत्रज्ञानाद्वारे भुयारी गटारीच्या कामास सभेत मंजुरी न देण्याचा निर्णय सत्ताधाऱ्यांनी घेतला आहे. त्यामुळे या निविदा मंजूर होऊनही त्या निरर्थक ठरणार आहेत. 
 
वाद मिटविणार कोण? 
महापालिका आणि शासनाच्या नगरविकास मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी यांच्यात असलेला हा वाद मिटविणार कोण? असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. याबाबत अधिक माहिती घेतली असता, प्रभारी आयुक्त तथा जिल्हाधिकारी यांनी शासनाला दिलेल्या पत्राच्या आधारावर महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, जलसपंदामंत्री गिरीश महाजन यांची भेट घेत त्यांना याबाबतची माहिती दिली आहे. त्यांनीही महापालिकेची मागणी योग्य असल्याचे सांगितले. नगरविकास विभागाच्या अधिकाऱ्यांनाही सूचना देण्यात आल्या, तरीही त्यांचा हेका कायम असल्याचे बोलले जात आहे. दोघांच्या वादात मात्र जळगाव शहराचे नुकसान होणार आहे.

Web Title: marathi news jalgaon andergraound drenege