पन्नास बालकांना एक किलोचा आहार! 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 जुलै 2019

जळगाव ः जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा उज्ज्वला पाटील यांनी कासोदा गावातील अंगणवाडींना अचानक भेट दिली. या भेटीदरम्यान अंगणवाडी पोषण आहारात घोळ सुरू असल्याचे पाहण्यास मिळाले. अंगणवाडीतील उपस्थित 50 बालकांना केवळ एक ते दीड किलोचा आहार शिजविला जात असल्याचे निदर्शनास आले. 

कासोदा (ता. एरंडोल) येथील अंगणवाडी क्र. 13, 14 व 26 यांना भेट दिली असता उपस्थित बालकांना पुरेसा आहार न देता 50 बालकांना फक्त एक ते दीड किलोचा आहार शिजवला जातो. शासनाने ठरवून दिलेल्या शेड्युलप्रमाणे बदलता आहार न देता दररोज फक्त मुगाच्या डाळची खिचडी दिली जात असल्याची तक्रार पालकांनी अध्यक्षांकडे केली. यावरून येथील पोषण आहारामध्ये मोठा घोळ असल्याने उज्ज्वला पाटील यांनी महिला बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आर. आर. तडवी यांना फोन करून तत्काळ चौकशी करण्याचे आदेश दिले. तसेच येथील अनेक वर्षांपासून पोषण आहार देणाऱ्या बचत गटांना बदलून नवीन बचत गटांना संधी देण्याबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचेही अध्यक्षांनी सांगितले. 
तसेच रविवारी (ता. 14) अध्यक्षा श्रीमती पाटील यांनी पारोळा तालुक्‍यातील लोणी सीम, लोणी बू, बाहुटे, सारवेतांडा आदी गावांना भेटी दिल्या. त्यात लोणी येथील ग्रामसेवक श्री. न्हालदे सतत गैरहजर राहत असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon anganwadi poshan aahar 1 kg 50 child