अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मिळणार "स्मार्टफोन' 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 16 मार्च 2019

जळगाव : अंगणवाडीतील दैनंदिन कामकाजाचा अहवाल ऑनलाइन भरण्यासाठी कर्मचाऱ्यांना स्मार्टफोन देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील 3 हजार 640 अंगणवाडी कर्मचाऱ्यांना स्मार्टफोन दिला जाणार असून त्याद्वारे आता गरोदर माता आणि बालकांचे लसीकरणाची माहिती तत्काळ जिल्हा मुख्यालयाला मिळू शकणार आहे. 

जळगाव : अंगणवाडीतील दैनंदिन कामकाजाचा अहवाल ऑनलाइन भरण्यासाठी कर्मचाऱ्यांना स्मार्टफोन देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील 3 हजार 640 अंगणवाडी कर्मचाऱ्यांना स्मार्टफोन दिला जाणार असून त्याद्वारे आता गरोदर माता आणि बालकांचे लसीकरणाची माहिती तत्काळ जिल्हा मुख्यालयाला मिळू शकणार आहे. 
ऑनलाइन कामकाजाला आता सगळीकडे सुरवात झाली आहे. संगणकावर काम करून त्याचा इ-मेल पाठवून ऑनलाइन काम करण्याच्या पद्धतीवरून आता संगणक आणि लॅपटॉपवरून थेट मोबाईलवर ऑनलाइन कामकाज आले आहे. त्यामुळे अंगणवाडी सेविकांना आता स्मार्टफोनने कामकाज करावे लागणार आहे. जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी कर्मचाऱ्यांना हे स्मार्ट फोन वाटप केले जाणार असल्याचे महिला व बालविकास विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रफीक तडवी यांनी दिली. 
अनेक अंगणवाडी या दुर्गम भागात आहेत. काही ठिकाणी इमारत नसल्यामुळे खासगी जागेत किंवा अंगणवाडी सेविकेच्या अंगणात अथवा ग्रामपंचायत कार्यालयात त्या भरवाव्या लागतात. यामुळे मोठ्या समस्येला सामोरे जावे लागत असते. त्यातच आता स्मार्टफोन येणार असल्याने तो प्रयोग कितपत शक्‍य होतो. याबाबत शंका आहे. 
अंगणवाडी सेविकांना गरोदर माता, बालकांचे वजन, लसीकरण, पूरक आहार यासह इतर बाबींची कामे असतात. या सर्व कामांचा अहवाल त्यांना केंद्र किंवा तालुकास्तरावर द्यावा लागत असतो. दुर्गम भागात रस्त्यांची व वाहनांची कमतरता लक्षात घेता असे अहवाल वेळेत सादर करण्याची मोठी कसरत अंगणवाडी कर्मचाऱ्यांना करावी लागते. मात्र स्मार्टफोनमुळे हे काम सोपे होणार आहे. आठवडाभरात हे स्मार्ट फोन येणार असून दर तीन महिन्यासाठी रिचार्जसाठी चारशे रुपये प्रमाणे अनुदान दिले जाणार आहे. यासाठीचे अनुदान जिल्हा परिषदेला प्राप्त झाले आहे. 
 

Web Title: marathi news jalgaon anganwadi sevika smart phone