खानदेश कन्येचा राजधानीत डंका! 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 सप्टेंबर 2019

पहूर, (ता. जामनेर) ः 'सद्‍रक्षणाय खलनिग्रहणाय' हे पोलीस दलाचे ब्रीद शिरसावंद्य मानून मुल पळविणाऱ्या पंधरा जणांच्या टोळीचा पर्दाफाश करीत सहा चिमुकल्यांची सुटका केल्याबद्दल खानदेश कन्या पोलिस निरीक्षक अपर्णा जोशी यांना मुंबईचे पोलीस आयुक्त संजय बर्वे यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देवून सन्मानित करण्यात आले. 

पोलीस आयुक्त कार्यालयात झालेल्या विशेष सोहळ्यात सदर सन्मान झाला. पहूर पेठ (ता. जामनेर) येथील मुळ रहिवासी असलेल्या अपर्णा जोशी या सध्या चेंबूर येथे गुन्हे शाखेत पोलिस निरीक्षक पदी कार्यरत आहेत. आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवित त्यांनी अनेक गुन्ह्यांचा पर्दाफाश केला असून त्यांनी नुकताच लहान मुलं पळवून त्यांची विक्री करणाऱ्या पंधरा जणांच्या टोळीच्या मुसक्‍या आवळल्या अन्‌ त्यांच्या ताब्यातील सहा बालकांना मुक्त केले. त्यांच्या या कामाबद्दल राजधानी मुंबई येथे पोलीस आयुक्तालयात झालेल्या विशेष कार्यक्रमात अपर्णा जोशी यांना पोलीस आयुक्त संजय बर्वे (मुंबई) यांच्या हस्ते गौरविण्यात आले. त्यांच्या या शौर्याचे पहूर गावांत सर्वत्र कौतूक होत असून त्यांनी गावकऱ्यांपुढे एक आदर्श उभा केला आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon aprna joshi satkar police aayukt