एटीएम कार्ड बदलवून भामट्याने दोघांना लुबाडले 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 16 फेब्रुवारी 2019

जळगाव : पैसे काढून देण्याच्या बहाण्याने एटीएमचा पीन नंबर विचारून व एटीएम परस्पर बदलवून घेत भामट्याने शहरातील दोन जणांना 67 हजार 500 रुपयांत गंडविल्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे, भामट्याने एका खात्यातून संपूर्ण पैसे काढून घेत तेच दुसऱ्याला देऊन त्याचे एटीएम बदलावून फसवणूक गेल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत दोघांनी सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. 

जळगाव : पैसे काढून देण्याच्या बहाण्याने एटीएमचा पीन नंबर विचारून व एटीएम परस्पर बदलवून घेत भामट्याने शहरातील दोन जणांना 67 हजार 500 रुपयांत गंडविल्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे, भामट्याने एका खात्यातून संपूर्ण पैसे काढून घेत तेच दुसऱ्याला देऊन त्याचे एटीएम बदलावून फसवणूक गेल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत दोघांनी सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. 
रामेश्‍वर कॉलनी परिसरातील लक्ष्मीनगरातील रहिवासी शांताराम पूना गोपाळ (वय 35) यांची आई आजारी असल्याने तिच्या उपचारासाठी त्यांना पैशांची आवश्‍यकता होती. यासाठी 10 फेब्रुवारीला सायंकाळी पाचला पैसे काढण्यासाठी ते स्वातंत्र्य चौकातील स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या एटीएममध्ये आले. गोपाळ यांनी त्यांनी त्यांच्याजवळ असलेल्या एटीएमव्दारे पैसे काढण्याचा प्रयत्न केला मात्र पैसे निघाले नाही. या दरम्यान भामट्याने त्यांना मी तुम्हाला पैसे काढून देतो, असे म्हणत कार्ड घेतले. ते स्वाईप करून त्याच्यासमोर पीन नंबर टाकण्यास सांगितला. यानंतर एटीएममधून पावतील बाहेर पडली. भामट्याने गोपाळ यांना तुमच्या खात्यात पैसे नसल्याचे सांगितले. बोलण्यात ठेवून भामटेगिरी करीत एटीएम बदलविले. गोपाळ यांच्या एटीएमवरुन त्या भामट्याने शहरातील ठिकठिकाणच्या बॅंकेतून 53 हजार रुपये काढून घेतले. यात एका ठिकाणी त्याने 4 हजार रुपयांची खरेदी केल्याचे समोर आले आहे. 11 फेब्रुवारीला गोपाळ पुन्हा स्वातंत्र्य चौकातील एटीएममध्ये पैसे काढण्यात गेले असता पैसे निघत नव्हते. यानंतर बॅंकेत गेले असता सदरचे एटीएम वसंत भाऊराव पाटील यांचे असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. गोपाळ यांच्या खात्यातून भामट्याने शहरातील एका एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी आलेल्या वसंत रतन पाटील यांनाही भामट्याने याचपध्दतीने गंडा घालवीत स्वतःकडील खराब एटीएम सोपवून पाटील यांच्याकडून मूळ एटीएम बदलावून घेतले व ठिकठिकाणच्या एटीएमवरुन त्यांच्या खात्यावरील 14 हजार 500 रुपये काढून घेतले. वसंत पाटील यांचे खात्यावरून पैसे संपल्यावर हेच एटीएम त्यांना शांताराम गोपाळ यांना देत गोपाळ यांच्या एटीएमवरुन 53 हजार 500 रुपये काढल्याचे समोर आले. गोपाळ तसेच वसंत पाटील यांनी सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. दरम्यान पोलिसांनी 10 व 11 फेब्रुवारीला विविध बॅंकेच्या एटीएममधील सीसीटीव्ही फुटेज मिळविण्यासाठी बॅंकांकडे पत्रव्यवहार केला आहे. 

Web Title: marathi news jalgaon ATM card