एटीएम कार्ड खिशात असताना ग्राहकाचे परस्पर 20 हजार लंपास 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 सप्टेंबर 2019

जळगाव : शहरातील उस्मानिया पार्क येथील रहिवासी व एसटी महामंडळातील निवृत्त वाहन परीक्षक समसोद्दिन चिरागोद्दीन शेख यांच्या स्टेट बॅंकेच्या खात्यातून 20 हजार रुपये लंपास झाले आहेत. एटीएम खिशात असताना आणि ओटीपी कोणालाही सांगितला नसताना खात्यातून पैसे लंपास झाल्याची तक्रार शेख यांनी दिली आहे. दरम्यान, या प्रकारात एटीएम कार्ड क्‍लोनिंग केल्याचा संशय असून, सायबर पोलिस गुन्ह्याचा तपास करत आहेत. 

उस्मानिया पार्क येथील रहिवासी समसोद्दिन चिरागोद्दिन शेख यांचे पेन्शन खाते स्टेट बॅंकेच्या दाणाबाजार शाखेत आहे. शनिवारी (ता.21) शेख घरीच असताना त्यांच्या मोबाईलवर दहा हजार रुपये "विड्रॉल' झाल्याचा संदेश आला. त्यांनी तत्काळ चौकशी करत बॅंकेत जाऊन विचारणा केली. व्यवस्थापक आणि संबंधित कर्मचारी पाहणी करत असतानाच भामट्याने परत दहा हजार विड्रॉल केले. नंतर परत तो प्रयत्नात असल्याचे लक्षात आले. शेख यांनी या प्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात जाऊन लेखी तक्रार दिली असून बॅंकेतही तक्रार नोंदविली आहे. 

साताऱ्यात काढले पैसे 
सायबर गुन्हेगारांनी शेख यांच्या खात्यातून जुना सातारा येथून रक्कम दुसरीकडे वळती केली असून, नंतर काढण्यात आली आहे. शेख यांनी त्यांचे खाते तूर्तास बंद केले असून, दाखल तक्रारीवर सायबर पोलिस आणि स्टेट बॅंक कर्मचारी काम करीत आहेत. 

"एटीएम' ग्राहकाकडे असतानाही चोरी 
एटीएम कार्ड समसोद्दीन शेख यांच्याकडे असताना त्यांच्या खात्यातून रक्कम लंपास झाली. खात्याचा ओटीपी कळविल्यावर किंवा एटीएमचे शेवटचे चार आकडे सांगितल्यावर अशी रक्कम वळती करता येते. मात्र, तसे काहीही झाले नसताना 20 हजार रुपये परस्पर लंपास झाले असून, एटीएम क्‍लोनिंगचा प्रकार असल्याचा संशय व्यक्त होत आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon atm card 20 thiusand cash