लोणवाडीत बारावर्षीय मुलावर दोघांकडून अत्त्याचार 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 25 मार्च 2018

जळगाव : लोणवाडी तांडा (ता.जळगाव) येथील बारावर्षीय अल्पवयीन बालकाला सोबत बकऱ्या चारण्यासाठी माळरानावर नेत दोघांतर्फे अत्त्याचार करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पिडीत बालकाचे पोट दुखत असल्याचे त्याने सांगीतल्यावरुन पालकांनी औषधोपचार केले, पोट का दुखतयं याची चौकशी केल्यावर घडल्या प्रकाराची माहिती पालकांना मिळाल्यावरुन त्यांनी आज औद्योगीक वसाहत पोलिसांत तक्रार दिल्यावरुन गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. 

जळगाव तालूक्‍यातील लोणवाडी तांडा येथील रहिवासी कुटूंबातील बबन मैरु धाडी (काल्पनीक नाव) या बारा वर्षीय बालकाचे आईवडील शेत मजुरी करुन कुटूंबाची गुजराण करतात. घरात आईवडीलांसह लहान भाऊ बहीण असा परिवार आहे. कुटूंबाचा उदनिर्वाह चालावा यासाठी घेतलेल्या बकऱ्या चारवण्याची जबाबदारी बबन याच्यावर होती. शाळेतून घरी परतल्यावर तो बकऱ्या चारण्यासाठी जात होता. मात्र गेल्या काही महिन्यापासुन तो शाळेतही गेलेला नसुन शनिवार(ता.24) रोजी त्याच्या पोटात अचानक दुखायला लागल्याने वडीलांनी गावातूनच मेडीकलवरुन त्याला औषध आणुन दिले. नेहमी नेहमी पोटात का, दुखते म्हणुन वडीलांनी विश्‍वासात घेत विचारणा केली, बाहेर काही खाल्ले काय..किंवा कशामुळे तुझे पोट नेहमी नेहमी दुखते हे विचारल्यावर बबन याने घडला प्रकार वडीलांना सांगीतला. मुलावर दोघा वयस्कांकडून अत्त्याचार होत असल्याचे माहिती कळताच वडीलांनी मुलाला घेवुन आज जळगाव गाठले. औद्योगीक वसाहत पोलिसात घडल्या प्रकाराची माहिती देत तक्रार नोंदवण्यात आली. पिडीत बालकाने दिलेल्या तक्रारी नुसार, पोलिस उपनिरीक्षक योगेश शिंदे, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, कैलास धाडी, संदिप पाटील यांनी तत्काळ घटनास्थळ गाठत संशयीताचा शोध घेत ताब्यात घेतले. 
 
दारुची "पोटली' पाजुन अत्त्याचार 
ग्रामीण भागात गावठी हातभट्टीची दारु प्लॅस्टीक पाऊच (पोटली) मध्ये भरुन विक्री होते, बबन धाडी या बालकावर अत्त्याचार करणारे दोघेही वयस्क भामट्यांना दारुचे व्यसन असल्याने त्याच्या खिश्‍यात नेहमीच दारुची पोटली राहत होती. दुपारी या बालकावर अत्त्याचार करण्यापुर्वी त्याच्या तोंडात बळजबरीने दारुची पोटली ओतल्यावर दोघांकडून अमानवीय अत्त्याचार करण्यात येत असल्याचेही पिडीत बालकाने सांगीतले.

Web Title: marathi news jalgaon atyachar