जिल्ह्यात सरासरीच्या 91 टक्के पाऊस 

जिल्ह्यात सरासरीच्या 91 टक्के पाऊस 

जळगाव ः जिल्ह्यात आजअखेर एकूण सरासरीच्या 91 टक्के पाऊस झाला असून, दमदार पावसामुळे हतनूर, वाघूर, गिरणा ही धरणे भरण्याच्या मार्गावर आहेत. तर मध्यम प्रकल्पही लवकरच भरतील, असा अंदाज वर्तविण्यात आला. दरम्यान, रावेर व यावल तालुक्‍यांनी पावसाची शंभरी पार केली आहे. या तालुक्‍यात एकूण सरासरीच्या शंभर टक्‍क्‍यांपेक्षा अधिक पाऊस झालेला आहे. 
जिल्ह्याची पावसाची सरासरी 9949.4 मिलिमीटर आहे. आजअखेरपर्यंत 8966.6 मिलिमीटर पाऊस झाला आहे. जिल्ह्यात पाऊस जून महिन्यात 23 जूनला सुरू झाला असला तरी पावसाने नव्वदी पार केली आहे. यामुळे पावसाबाबत शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. यंदा चांगला हंगाम येईल, असा अंदाज आहे. 

आता पाऊस नको.. 
आता बहुतांश पिकांना पाऊस पुरेसा झालेला आहे. उडीद, मुगाच्या शेंगा काढण्याची कामे सुरू आहेत. कपाशीला बोंडे फुटून ती फुटीच्या अवस्थेत आहेत. अशात पाऊस झाल्यास उडीद, मूग वाया जाण्याची भीती आहे. तर कपाशीचे बोंडेही खराब होण्याची शक्‍यता आहे. यामुळे आतापाऊस नको. पाऊस झाल्यास तो पिकांसाठी हानिकारक ठरेल असे शेतकरी सांगतात. 

तालुका--आतापर्यंतचा पाऊस 
जळगाव--87.0 
जामनेर--93.3. 
एरंडोल--90.4 
धरणगाव--85.7 
भुसावळ-95.4 
यावल-102.5 
रावेर-108.6 
मुक्ताईनगर--98.0 
बोदवड--89.3 
पाचोरा--80.8 
चाळीसगाव--72.9 
भडगाव--78.6 
अमळनेर--87.9 
पारोळा--86.5 
चोपडा--94.1 

एकूण--901. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com