नाथाभाऊ मंत्रिमंडळाला आदेश देऊ शकतात :  पंकजा मुंडे 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 8 डिसेंबर 2018

भुसावळ : मंत्रीमंडळात माझ्यासह राज्यातील कोणत्याही मंत्र्याला नाथाभाऊ आदेश देवू शकतात, त्यांनी दिलेला आदेश आम्हाला शिरसावंद्य असेल. असे मत राज्याच्या महिला व बालकल्याण, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केली. 

भुसावळ : मंत्रीमंडळात माझ्यासह राज्यातील कोणत्याही मंत्र्याला नाथाभाऊ आदेश देवू शकतात, त्यांनी दिलेला आदेश आम्हाला शिरसावंद्य असेल. असे मत राज्याच्या महिला व बालकल्याण, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केली. 

गुरूनाथ फाउंडेशनतर्फे खासदार रक्षाताई खडसे यांनी भुसावळ येथे बहिणाई महोत्सवाचे आयोजन केले आहे. भुसावळ येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावर पाच दिवस चालणाऱ्या हा महोत्सवाचे उद्‌घाटन राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले. माजी महसुल मंत्री एकनाथराव खडसे अध्यक्षस्थानी होते. तर राज्याचे पर्यटनमंत्री जयकुमार रावळ, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, आमदार संजय सावकारे, आमदार सुरेश भोळे, आमदार चंद्रकांत सोनवणे आदी उपस्थित होते. खासदार रक्षा खडसे यांनी प्रास्ताविकातून बहिणाई महोत्सव आयोजन करण्याचे उदिष्ट सांगितले. 
पंकजा मुंडे म्हणाल्या, कि महिलांना जीवनात नेहमी संघर्षच करावा लागतो, कवियत्री बहिणाबाई चौधरी यांनी आपल्या अरे..संसार..संसार या काव्यातून स्पष्टपणे मांडले आहे. बहिणाईसारख्या महोत्सवातून आपल्या भागातील तसेच राज्याची कला व संस्कृतीची जोपासना होते, माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्याबाबत बोलतांना त्या म्हणाल्या, नाथाभाऊ आज माझ्यासह राज्यातील कोणत्याही मंत्र्याला आदेश देवू शकतात. एवढे ते सिनिअर आहेत. त्यांचा आदेश आम्हाला शिरसावंद्य आहे 

Web Title: marathi news jalgaon bahinabai mahotsav pankja munde