बहिणाबाई स्मारकाला निधीची अडचण 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 11 ऑगस्ट 2018

जळगाव ः खानदेश कन्या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे स्मारक असोदा (ता.जळगाव) येथे बांधण्यात येत आहे. त्यासाठी दहा ते पंधरा लाखांची मागणी असताना शासनाकडून निधी उपलब्ध झालेला नाही. यामुळे स्मारकाचे बांधकाम 50 टक्‍क्‍यांवर अडकून पडले आहे. पूर्वीच्या आराखड्यानुसार स्मारकाची उंची 18 मीटर होती. त्यात बदल करून 10 मीटर उंची ठेवून साडेपाच ते सहा लाखांचे काम करण्याचा खटाटोप सुरू आहे. 

केवळ खानदेशलाच नव्हे तर महाराष्ट्राला कवयित्री बहिणाबाई चौधरी परिचित आहे. जीवनातील सत्यता त्यांच्या कवितेतून स्पष्ट होतात. त्यांचा वारसा नवीन पिढीला कायम स्मरणात राहावा, यासाठी बहिणाबाई चौधरींचे स्मारक असोदा येथे बांधण्याचे ठरविण्यात आले आहे. 
स्मारक बांधण्यासाठी असोद्यात बहिणाबाई चौधरी स्मारक समिती कार्यरत आहे. पूर्वी स्मारकाची उंची 18 मीटर करण्याचे ठरविले होते. दहा कोटींचा निधी देण्याचे शासनाने मान्यही केले होते. मात्र सत्तांतर झाल्यानंतर स्मारकाला शासनाकडून निधी मिळण्यासाठी लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा कमी पडत आहे. केवळ जिल्हा नियोजन समितीतून साडेसहा कोटी मंजूर करवून घेतले. यामुळे जुन्या प्लॅनमध्ये बदल करून स्मारकाची उंची आठ मीटरने कमी करण्यात आली. इतर नियोजनाप्रमाणे ठरलेल्या बांधकामातही बदल करून नव्याने आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यानुसार काम सुरू आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी योग्य माहिती देत नाही, असा आरोप स्मारक समितीचे पदाधिकारी करतात. 
 
"अम्पिथेअटर'चे काम अपूर्ण 
स्मारकाच्या मुख्य इमारतीचा ढाचा आता तयार झालेला आहे. दुसऱ्या मजल्यावर स्लॅब टाकण्यात आलेला आहे. "अम्पिथेअटर'चे काम अद्यापही सुरू झालेले नाही. याशिवाय इतर बांधकामही अपूर्ण आहे. एक हेक्‍टर सोळा आर. क्षेत्रात स्मारक तयार करण्यात येत आहे. 
 
कवयित्री बहिणाबाई चौधरी स्मारकाची उंची अठरा मीटर एवढी करण्याची ठरली होती. ती आठ मीटरने कमी करण्यात आली. उंची वाढविण्याबाबत लढा नव्याने सुरू करणार आहे. शासनाकडून निधी मिळाल्याशिवाय स्मारकाचे काम लवकर पूर्ण होणार नाही. 
किशोर चौधरी, अध्यक्ष कवयित्री बहिणाबाई चौधरी स्मारक समिती 

Web Title: marathi news jalgaon bahinabai smarak nidhi