केळी निर्यातीपुर्वीची कशी होते प्रक्रिया 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 डिसेंबर 2019

जळगाव जिल्ह्यातील केळी देशातच नव्हे; तर जगभरात प्रसिद्ध आहे. देशांतर्गत व देशाबाहेरही जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात केळीची निर्यात केली जाते. शेजारी व प्रतिस्पर्धी पाकिस्तानात जळगाव जिल्ह्यातील केळीला चांगली मागणी होती. पाकिस्तानमध्ये मोठी निर्यात व्हायची. गेल्या वर्षभरापासून मात्र पाकिस्तानातील केळी निर्यात पूर्णपणे बंद आहे. मात्र, दुबई व अन्य आखाती देशांमध्ये निर्यात होत आहे. 

जळगाव : उत्तरेकडील राज्यांमध्ये केळी निर्यात पॅकिंग व खुली अशा दोन स्वरूपात केली जाते. चांगल्या दर्जाचा माल खोक्‍यांमध्ये व्यवस्थित पॅक करून पाठविला जातो. त्या ठिकाणी माल उतरल्यानंतर तो शीतगृहात (कोल्ड स्टोरेज) ठेवला जातो. काश्‍मीरचे उदाहरण घेतल्यास जिल्ह्यातून ट्रक तेथे पोहोचण्यास पाच-सहा दिवस लागतात. नंतर आठ-दहा दिवसांनी तो माल बाजारात येतो. तत्पुर्वी केळी निर्यातीपुर्वी पाण्यात स्वच्छ धुवून पॅकिंग केली जाते. 

 

निर्यातीत चाळीस टक्‍के घट 
जम्मू-काश्‍मीरसह उत्तरेतील सर्व राज्ये व देशातील अन्य प्रांतांत जळगाव जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात केळी निर्यात होते. यंदा मात्र नोव्हेंबरमध्ये लांबलेला पाऊस व अवकाळी पावसाचा फटका केळीबागांना बसला असून, ही निर्यात 40 टक्‍क्‍यांनी घटल्याचे सांगितले जात आहे. काश्‍मीर व परिसरात सध्या जोरदार बर्फवृष्टी सुरू असून, थंडीच्या हंगामानंतर पुन्हा या भागात मागणी वाढेल, असे व्यापारी सांगत आहेत. 

Image may contain: 3 people, people sitting and outdoor

हेही पहा > चित्रपटातील हा विनोदी कलाकार पोट भरण्यासाठी नाचतोय जत्रेत

नैसर्गिक आपत्तीचे सातत्य 
कधीकाळी समृद्ध असलेल्या जिल्ह्यातील केळीबागांना गेल्या काही वर्षांपासून "ग्रहण' लागले. बेभरवशाचे हवामान, वादळासह गारपीट, अवकाळी पाऊस तसेच भूगर्भातील पाण्याच्या अतिरेकी उपशाचा परिणाम एकूणच केळी उत्पादन व तिच्या दर्जावर झाला आहे. गेल्या काही वर्षांत सातत्याने येणाऱ्या नैसर्गिक आपत्तींनी केळी उत्पादक अडचणीत आला असून, ही बाब गंभीर मानली जाते. 

क्‍लिक करा > मुलगी पहायला आले अन्‌ लग्न लावून गेले 

यंदा अतिवृष्टीचा फटका 
यंदा अन्य पिकांप्रमाणेच केळीबागांनाही अतिवृष्टी, अवकाळीचा फटका मोठ्या प्रमाणात बसला. जळगाव जिल्ह्यात 140 टक्‍क्‍यांवर पाऊस यावर्षी नोंदला गेला. पावसाळ्यानंतर महिनाभर पाऊस सुरूच होता. त्यामुळे केळीच्या उभ्या बागा या अवकाळी पावसाने उद्‌ध्वस्त केल्या. त्याचा एकत्रित परिणाम जिल्ह्यातील केळी निर्यातीवर झाला. ही निर्यात जवळपास 40 टक्‍क्‍यांनी घटल्याचे उत्पादक व केळी व्यापारी सांगतात. 

Image may contain: 1 person
काश्‍मीरला नियमित निर्यात 
जळगाव जिल्ह्यातील रावेर, यावल, चोपडा तालुक्‍यातून देशभरात केळी निर्यात होते. सावदा डेपोतून हे प्रमाण खूप मोठे आहे. जम्मू-काश्‍मीरसह उत्तरेकडील सर्व राज्यांमध्ये जिल्ह्यातील चांगल्या दर्जाची केळी पाठविली जाते. आता काश्‍मिरात बर्फवृष्टी सुरू असल्यामुळे मागणी कमी असून हा हंगाम संपल्यानंतर मागणी पुन्हा वाढेल, असे केळी उत्पादक तथा व्यापारी वसीम सैफुद्दीन यांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon banana dispach packing trancport