वादळग्रस्त केळी उत्पादकांना 100 कोटींची नुकसानभरपाई 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 29 जुलै 2018

मुक्ताईनगर : जून महिन्यातील चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या खान्देशातील केळी उत्पादकांचे 100 कोटींची नुकसान भरपाई मिळणार असल्याची माहिती खासदार रक्षा खडसे यांनी दिली. 

मुक्ताईनगर : जून महिन्यातील चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या खान्देशातील केळी उत्पादकांचे 100 कोटींची नुकसान भरपाई मिळणार असल्याची माहिती खासदार रक्षा खडसे यांनी दिली. 
राजधानी दिल्लीत कृषी मंत्रालयात 14 जूनला केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंग यांची माजी मंत्री आमदार एकनाथ खडसे, खासदार रक्षा खडसे, आमदार हरिभाऊ जावळे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, माजी सभापती सुरेश धनके आणि शिष्टमंडळाने भेट घेतली होती. खान्देशातील 1500 ते 1600 हेक्‍टर जमिनीवरील केळी पिकाचे नुकसान झाले पाहता सरकारने मदत जाहीर करावी अशी मागणी शिष्टमंडळाने राधा मोहनसिंग यांच्याकडे केली होती. या पार्श्वभूमीवर दोन दिवसांपूर्वी खासदार रक्षा खडसे यांनी पुन्हा राधा मोहन सिंग यांची भेट घेतली. त्यावेळी राधा मोहन सिंग यांनी पीक विमा काढलेल्या व नुकसानभरपाईच्या निकषांमध्ये बसणाऱ्या केळी उत्पादकांचे 100 कोटीचे दावे मंजूर करण्याचे संकेत दिले. 
पीक विमा संरक्षण असलेल्या पण नुकसानभरपाईच्या निकषात नसणाऱ्या केळी उत्पादकांसाठी, राज्य सरकार आणि विमा कंपन्यांच्या अधिकाऱ्यांची तातडीची दिल्लीत बैठक झाली होती,अशा केळी उत्पादकांना सुद्धा मदत देणार असल्याचे रक्षा खडसे म्हणाल्या.

Web Title: marathi news jalgaon banana farmer 100 carore