केळी विमा धारकांना मिळणार भरपाई 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 14 एप्रिल 2019

रावेर ः मार्चअखेर वाढलेल्या तापमानाचे आकडे पाहता तालुक्यातील रावेर मंडळाचा अपवाद वगळता सर्वच महसूल मंडळातील केळी विमा धारकांना भरपाई मिळणे निश्चित झाले आहे. दरम्यान, एप्रिलच्या पहिल्या पंधरवड्यातील ऊन पाहता रावेर महसूल मंडळातील विमाधारक केळी उत्पादकांना देखील भरपाई मिळण्याची शक्यता आहे. 

रावेर ः मार्चअखेर वाढलेल्या तापमानाचे आकडे पाहता तालुक्यातील रावेर मंडळाचा अपवाद वगळता सर्वच महसूल मंडळातील केळी विमा धारकांना भरपाई मिळणे निश्चित झाले आहे. दरम्यान, एप्रिलच्या पहिल्या पंधरवड्यातील ऊन पाहता रावेर महसूल मंडळातील विमाधारक केळी उत्पादकांना देखील भरपाई मिळण्याची शक्यता आहे. 

रावेर तालुक्यात मार्चच्या शेवटच्या आठवड्यात वातावरणातील तापमानात सतत वाढ झाली आहे. यामुळे तालुक्यातील खिर्डी, ऐनपूर या महसूल मंडळात २५ ते ३१ मार्च दरम्यान सतत पाच दिवस ४१ डिग्री सेल्सियस पेक्षा अधिक तापमान तर सावदा खिरोदा प्र यावल, खानापूर व व निंभोरा बुद्रूक या महसूल मंडळात सतत तीन दिवस किंवा त्यापेक्षा जास्त ४०.५ डिग्री सेल्सियस पेक्षा जास्त तापमानाची नोंद झाली आहे. यामुळे सहा महसूल मंडळातील केळी उत्पादक शेतकरी विम्यासाठी पात्र ठरले आहेत. तालुक्यात सर्वाधिक तापमान ३१ मार्च रोजी सावदा येथे ४४.२७ व खिर्डी बुद्रूक येथे ४४.२ डिग्री सेल्सीयस तापमानाची नोंद झाली आहे. सतत ३ दिवस ४० डिग्री सेल्सिअस पेक्षा जास्त तापमान राहिल्यास हेक्टरी १२ हजार रुपये, सतत ४ दिवस-हेक्टरी १९ हजार रुपये आणि सतत ५ दिवस तापमान ४० डिग्री सेल्सिअस पेक्षा जास्त असल्यास हेक्टरी ३३ हजार रुपये भरपाई विमा कंपनी देते. तापमानाचा वाढता आलेख पाहता लागोपाठ ५ दिवस ४० डिग्री सेल्सिअस तापमान राहणे सहज शक्य असल्याने खिर्डी, ऐनपूर, सावदा, खिरोदा प्र यावल, खानापूर, निंभोरा आणि रावेर या सातही महसूल मंडळात केळीचा विमा काढलेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी ३३ हजार रुपये भरपाई मिळणे निश्चित समजले जात आहे. दरम्यान, किमान तापमानाचेही हेक्टरी ३३ हजार रुपये भरपाई मिळणे निश्चित आहेच. विम्याची मुदत संपल्यावर दिवाळीपूर्वी ही रक्कम मिळणे अपेक्षित आहे. 

केळीच्या भावात ९० रुपयांनी वाढ 
गेल्या आठवडाभरात केळीच्या भावात नव्वद रुपये क्विंटलने वाढ झाली आहे. केळीच्या मागणीत वाढ होऊन दर्जेदार केळीच्या कापणीत काहीशी घट झाल्याने भाववाढ झाल्याचे बाजार समितीच्या केळी भाव निश्चयन समितीचे प्रमुख रामदास पाटील (निंबोल) यांनी सकाळला सांगितले. आठ एप्रिल ला केळीचे भाव ९२५ रुपये क्विंटल फरक १४ असे एकूण १००९ रुपये होते ते वाढत जाऊन आज (ता. १३) १००१ रुपये क्विंटल रुपये फरक १६ रुपये असा एकूण १०९७ रुपये आहे. मात्र दर्जेदार व निर्यातक्षम केळीची मागणी बाजारपेठेत वाढली आहे म्हणून भावात वाढ झाली आहे. दरम्यान, लवकरच मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान महिना सुरू होणार आहे. या महिन्यात रोजा सोडण्यासाठी केळीचा वापर करण्याचे महत्त्व असल्याने या काळातही केळीचे भाव टिकून राहतील किंवा वाढतील असा अंदाज आहे. 

Web Title: marathi news jalgaon banana former policy