जळगावची केळी पोहोचली सातासमुद्रापार! 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 25 ऑगस्ट 2018

गणपूर (ता. चोपडा) ः केळी उत्पादनात महाराष्ट्र तिसऱ्या स्थानावर आहे. मात्र, जळगाव जिल्ह्याची केळी आखाती देशांसह अन्य अनेक देशांत पोहोचली आहे. 
देशात तमिळनाडू प्रथम क्रमांकाचे उत्पादित राज्य ठरले असून, देशात प्रथम राहणारे गुजरात द्वितीय स्थानावर गेले आहे. जळगाव, सोलापूर आदी भागांतील केळी उत्पादक पिकाच्या उत्पादन, दर्जा, प्रत आणि वाद्याच्या लांबीबाबत पुढे असून, अलीकडे जळगावमधून विदेशात केळी निर्यात झाली आहे. जैन इरिगेशनचे परदेशातील करार व सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीची केळी निर्यातीतील मध्यस्थी त्यासाठी कामी आली आहे. 

राष्ट्रीय फलोत्पादन महामंडळाच्या (एनएचबी) आकडेवारीनुसार देशात आठ लाख 57 हजार हेक्‍टरवर केळीची लागवड यावर्षी झाली. ती गेल्या वर्षी आठ लाख 60 हजार क्षेत्रावर झाली होती. त्यातून गेल्या वर्षी तीस हजार 477 दशलक्ष टन उत्पादन झाले होते. यावर्षी ते तीस हजार 201 दशलक्ष टन इतके झाले. 
राज्यात यावर्षी 3600 दशलक्ष टन केळीचे उत्पादन झाले. तमिळनाडूत 5136.20 दशलक्ष टन इतके झाले. गेल्या वर्षी देशात प्रथम क्रमांकावर राहिलेल्या गुजरातमध्ये यावर्षी 4523.49 दशलक्ष टन केळी उत्पादन झाल्याने गुजरात उत्पादनात प्रथमवरून द्वितीय क्रमांकावर गेले आहे. 
राज्यात अग्रेसर असलेल्या जळगाव जिल्ह्यात वादळी वारा, गारपीट यांचा फटका बसू लागल्याने नुकसानीमुळे उत्पादन घटले आहे. जूनमध्ये जिल्ह्यात सुमारे चार हजार एकर क्षेत्रावरील केळी पिकाचे नुकसान झाले होते. सद्यःस्थितीत जळगाव जिल्ह्यात सुमारे 50 हजार हेक्‍टरवर केळी पीक असून, नवीन लागवड किरकोळ क्षेत्रावर सुरू असून, ऑक्‍टोबरमध्ये लागवड क्षेत्रात वाढ होईल. 

तालुकानिहाय लागवड (हेक्‍टरमध्ये) 
जळगाव- 4562 
बोदवड- 205 
भुसावळ- 708 
यावल- 9952 
रावेर- 18,215 
मुक्ताईनगर- 4610 
अमळनेर- 139 
चोपडा- 3100 
एरंडोल- 110 
धरणगाव- 536 
पारोळा- 40 
चाळीसगाव- 400 
जामनेर- 769 
पाचोरा- 517 
भडगाव- 985 
 
Web Title: marathi news jalgaon banana videsh transport