व्यापाऱ्यांच्या बंदमुळे कोटींची उलाढाल ठप्प 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 21 मार्च 2018

जळगाव - महापालिकेच्या विविध व्यापारी संकुलातील व्यापाऱ्यांनी आजपासून बंद पुकारल्याने अठरा व्यापारी संकुलातील दुकाने आज बंद होती. या बंदमुळे कोट्यवधी रुपयांची उलाढाल ठप्प झाली. 

जळगाव - महापालिकेच्या विविध व्यापारी संकुलातील व्यापाऱ्यांनी आजपासून बंद पुकारल्याने अठरा व्यापारी संकुलातील दुकाने आज बंद होती. या बंदमुळे कोट्यवधी रुपयांची उलाढाल ठप्प झाली. 

शहरातील फुले मार्केट, सेंट्रल फुले मार्केट, गांधी मार्केट, बी. जे. मार्केट, नवीन बी. जे. मार्केट, शाहू मार्केट यासह विविध महापालिकेच्या व्यापारी संकुलातील गाळेधारकांनी विविध मागण्यांसाठी व्यापार बंद आंदोलन पुकारले आहे. आज सकाळी व्यापाऱ्यांचा मूक मोर्चाही जिल्हाधिकारी कार्यालयावर निघाला होता. या सर्व मार्केटमध्ये दररोज हजारो ग्राहक विविध वस्तू, कपडे विविध साहित्य खरेदीसाठी येथे येतात. त्यातून कोट्यवधींची उलाढाल होते. आज व्यापाऱ्यांचा बंदमुळे दुकानेही बंद होती. या व्यापारी संकुलात एरवी पाय ठेवायला जागा नसते, तेथे आज शुकशुकाट दिसत होता. अनेक ग्राहक आज बाजारात आले. मात्र त्यांना बंदमुळे खरेदी न करताच परतावे लागले. काहींनी गोलाणी मार्केट अथवा ज्याठिकाणी मिळेल तेथून वस्तू खरेदी करण्यावर भर दिला. 

व्यापारी महामंडळाचा पाठिंबा 
व्यापाऱ्यांचा बंदला जळगाव जिल्हा व्यापारी महामंडळाने पाठिंबा दिला होता. त्यामुळे महामंडळाच्या सर्व सदस्य व्यापाऱ्यांनी दुपारी एकपर्यंत आपली दुकाने बंद ठेवून मोर्चात सहभाग घेतल्याची माहिती महामंडळाचे उपाध्यक्ष युसूफ मकरा यांनी दिली. 

8 ते 10 हजारांचा सहभाग 
व्यापाऱ्यांच्या मूक मोर्चात आठ ते दहा हजार व्यापारी बांधव सहभागी झाले होते. शांततामय मार्गाने मोर्चा निघाला. अठरा व्यापारी संकुलात दररोज लाखोंची उलाढाल होते. ती आज ठप्प झाल्याची माहिती फुले मार्केट असोसिएशनचे पदाधिकारी रमेश मत्तानी यांनी दिली.

Web Title: marathi news jalgaon band