दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ बंद 

live photo
live photo

जळगाव ः जम्मू- काश्‍मीरमधील पुलवामा येथे दहशतवाद्यांकडून भारतीय जवानांच्या वाहनावर करण्यात झालेल्या आत्मघाती हल्ल्याचे पडसाद जिल्ह्यात दुसऱ्या दिवशी देखील उमटत आहेत. या दहशतवादी हल्ल्याच्या विरोधात शहरातील व्यापारी संकुलातील दुकाने बंद करण्याचे आवाहन युवकांनी केले. यानंतर मार्केट परिसरातील सर्व दुकाने बंद करण्यात आली. 
पुलवामा येथे गुरूवारी (ता.14) झालेल्या दहशतवादी हल्ल्यात भारतीय जवान शहीद झाले. या हल्ल्याचा निषेध सर्वत्र केला जात असून, आज (ता.16) जळगाव शहरासह जिल्ह्यात पडसाद उमटत आहे. यात जिल्ह्यातील काही ठिकाणी कडकडीत बंद पाडण्यात आला आहे. दरम्यान शहरातील गोलाणी मार्केट, फुले मार्केट तसेच नवी पेठ परिसरातील दुकाने सकाळी दहा- साडेदहाला उघडण्यात आले होते. मात्र साधारण साडेअकराच्या सुमारास दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ युवकांनी संकुलांमध्ये जात बंद करण्याचे आवाहन केले. यामुळे गोलाणी मार्केट, फुले मार्केटमधील व्यापाऱ्यांनी दुकाने बंद करण्यात आली. यामुळे सर्वत्र शांतता होती. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com