सुरक्षारक्षकांच्या गराड्यातील दुधफेडरेशनची बॅंक फोडली 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 एप्रिल 2018

जळगाव : जळगाव जिल्हा दुधउत्पादक संघाच्या (दुध फेडरेशन) आवारात कार्यरत असलेल्या जिल्हाबॅंक शाखेत चोरट्यांनी धुमाकुळ घातला. शुक्रवारी संध्याकाळी भरणा होवुन दोन दिवस बॅंक बंद असल्याची संधी साधत चोरट्यांनी संधी साधली. सीसीटिव्ही कॅमेरा तोडून बॅंकेच्या मुख्यदारातून आत प्रवेश करीत तिजोरी तोडण्याचा प्रयत्न केला असुन तिजोरी न तुटल्याने आतील लाखो रुपयांची रोकड सुरुक्षीत राहिली. विशेष म्हणजे शंभर दिडशे फुटावर सुरक्षा कॅबिन आणि संपुर्ण प्लॉंट मध्ये तब्बल 47 सुरक्षारक्षक तैनातीला असतांना चोरट्यांनी बॅंक फोडण्याचा प्रयत्न केल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे. 

जळगाव शहरातील जिल्हादुध उत्पादक संघ अर्थात दुधफेडरेशनच्या आवारात आर्थिक व्यवहारासाठी जळगाव जिल्हा मध्यवर्ती बॅंकेची शाखा कार्यरत आहे. फेडरेशनमध्ये होणारे सर्व आर्थीक व्यवहारांची देवाणघेवाण या शाखेतून केली जाते. शुक्रवार (ता.13) रोजी संध्याकाळी 6.10 मिनीटांनी बॅंक मॅनेजर लक्ष्मण भोळे यांनी नेहमीप्रमाणे कॅश टॅली करुन 5 लाख 24 हजार 140 रुपयांची रोकड बॅंकेच्या मुख्यतिजोरीत ठेवली. दुसऱ्यादिवशी शनिवार(ता.14) डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती, रविवार (ता.15) रोजी दोन दिवस सलग सुट्या आल्याने बॅंक बंद होती. आज नेहमी प्रमाणे बॅंक कर्मचारी, मॅनेजर श्री.भोळे सकाळी अकरा वाजता बॅंक उघडण्यासाठी आले असता, बॅंकेचे मुख्यप्रवेशद्वाराची कडी तुटलेली व दार ओढलेले होते, आत जावुन बघीतल्यावर दाराचे कुलूप काऊंटरवर आढळले, आत जावुन बघीतल्यावर बॅंकेची मुख्य तिजोरी जवळ मोठ-मोठे दगड, लोखंडी पाईप, टोचा पडलेला आढळून येताच बॅंकफोडल्याचे आढळून येताच भोळे यांनी शहर पोलिस ठाण्यात फोनवरुन घटना कळवली. सहाय्यक फौजदार वासुदेव सोनवणे, विजयसींग पाटील, गणेश शिरसाळे, सदा झोपे आदींचे पथकाने दुधफेडरेशन गाठत बॅंकेची शाखा गाठली. 

डॉगस्कॉड-ठसेतज्ञांना पाचारण 
पोलिसपथकाने घटनास्थळाची पहाणी केल्यावर स्नायपर डॉगसहीत, ठसे तज्ञांच्या पथकाला पाचारण करण्यात आले, ठसे तज्ञांनी तिजोरीचे हॅण्डल, टेबल आणि इतर किकाणाहुन बोटांचे ठसे संकलीत केले असून श्‍वान पथकाला वास दिल्यावर त्याने बाहेर पडीत दुधफेडरेशनच्या कुंपणा पर्यंतचा मार्ग दाखवत त्याच परीसरात श्‍वान घुटमळत होता.

Web Title: marathi news jalgaon bank daroda