बॅंकांच्या सलग सुट्यांमुळे ग्राहकांची धावपळ!

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 28 एप्रिल 2018

जळगाव ः चार दिवसांच्या सलग सुट्या आल्याने बॅंकांमधील आर्थिक व्यवहारांना ब्रेक लागणार असल्याचे चित्र आहे. शिवाय सलग चार दिवसांच्या सुटीमुळे बॅंकेचे व्यवहार देखील ठप्प होणार आहेत. यातच बहुतांश एटीएममध्ये कॅश नसल्याने चार दिवसांच्या सुटीत बॅंक ग्राहकांची प्रचंड धावपळ उडणार आहे. परिणामी आजच बॅंकांमध्ये दिवसभर गर्दी होती. 

जळगाव ः चार दिवसांच्या सलग सुट्या आल्याने बॅंकांमधील आर्थिक व्यवहारांना ब्रेक लागणार असल्याचे चित्र आहे. शिवाय सलग चार दिवसांच्या सुटीमुळे बॅंकेचे व्यवहार देखील ठप्प होणार आहेत. यातच बहुतांश एटीएममध्ये कॅश नसल्याने चार दिवसांच्या सुटीत बॅंक ग्राहकांची प्रचंड धावपळ उडणार आहे. परिणामी आजच बॅंकांमध्ये दिवसभर गर्दी होती. 
आर्थिक वर्षातील शेवटचा मार्च महिना संपला असून, एप्रिलमध्ये देखील याचे कामकाज साधारण पंधरा दिवसांपर्यंत सुरू होते. यामुळे सर्वच शासकीय-निमशासकीय कार्यालये तसेच बॅंका, पतसंस्थांचे आर्थिक वर्षातील जमाखर्चाचा हिशोब करण्याची काम सुरू असतात. दरम्यान गेल्या पंधरा- वीस दिवसांपासून सर्वच बॅंकांच्या एटीएम मशिनमध्ये पैशांचा खडखडाट आहे. यामुळे नागरिकांना रक्‍कम काढण्यासाठी बॅंकांमध्येच जावे लागत होते. यातच आता चार दिवसांच्या सुट्या आल्याने आर्थिक व्यवहारांवर परिणाम होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. ही बाब लक्षात घेता अनेकांनी बॅंकांमध्ये जाऊन आपले आर्थिक व्यवहार करण्यावर आज भर दिला होता. 

बॅंकांमध्ये दिवसभर रांगा 
सलग चार शासकीय सुट्या आल्याने बॅंक ग्राहकांची पंचाईत झाली आहे. बॅंकांना 28 एप्रिलला दुसरा शनिवार, 29 एप्रिलला रविवार, 30 एप्रिलला बुद्धपौर्णिमा आणि 1 मे महाराष्ट्र दिनानिमित्ताने सुटी आहे. यामुळे पुढील चार दिवसांच्या सुटीमुळे बॅंकांमधील आर्थिक व्यवहार बंद राहणार असल्याने आज सर्वच बॅंकांमध्ये दिवसभर रांगा लागलेल्या होत्या. अनेक ग्राहकांनी कॅश काढणे, चेक जमा करणे, पैसे जमा करण्याचे काम करण्यासाठी सकाळपासून गर्दी होती. तर मू. जे. महाविद्यालयातील महाराष्ट्र बॅंकेत चलन भरणाऱ्या विद्यार्थ्यांची मोठी रांग लागलेली होती. 

"एटीएम'च्या आधाराची शक्‍यता 
बॅंकांना सलग सुट्या आल्यानंतर ग्राहकांची अडचण होऊ नये; यासाठी एटीएममध्ये सुटीच्या कालावधीत पुरेल इतकी रक्‍कम बॅंकांकडून ठेवलेली असते. परंतु, गेल्या पंधरा- वीस दिवसांपासूनच "एटीएम'मध्ये कॅशचा तुटवडा जाणवत आहे. यामुळे ग्राहकांना एटीएमच्या शोधात फिरावे लागत होते. काहींनी तर बॅंकेत जाऊनच रक्‍कम काढण्याचे काम केले होते. या साऱ्या परिस्थितीमुळे पुढच्या चार दिवसांच्या सुटीत बॅंक ग्राहकांना "एटीएम'चा किती आधार राहणार? याबाबत प्रश्‍न उपस्थित होत आहे. 

Web Title: marathi news jalgaon bank hollyday