जिल्ह्यातील 500 कोटींचे "क्‍लिअरिंग' ठप्प 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 31 मे 2018

जळगाव : सर्व राष्ट्रीयीकृत बॅंकांच्या अधिकारी- कर्मचारी संघटनांनी पुकारलेल्या दोनदिवसीय लाक्षणिक संपास जिल्ह्यात आज प्रतिसाद मिळाला. बॅंकांचे सर्व कर्मचारी यात सहभागी झाले असून, संप शंभर टक्के यशस्वी झाल्याचा दावा युनायटेड फोरम ऑफ बॅंक युनियन्सने केला आहे. दरम्यान, या संपामुळे जिल्ह्यातील 500 कोटींचे "क्‍लिअरिंग' ठप्प झाल्याचे सांगितले जात आहे. 
देशभरातील बॅंक अधिकारी- कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी दोनदिवसीय लाक्षणिक संप पुकारला आहे. आज संपाच्या पहिल्याच दिवशी जिल्ह्यातील बॅंकांमधील व्यवहार ठप्प होते. 

20 हजार कर्मचारी सहभागी 
जिल्ह्यात स्टेट बॅंकेच्या मुख्य शाखेसह इतर सर्व शाखा तसेच सहकारी व खासगी बॅंकांव्यतिरिक्त सर्व राष्ट्रीयीकृत बॅंकांच्या शाखांमधील जवळपास 20 हजार अधिकारी, कर्मचारी या संपात सहभागी झाले आहेत. या सर्व बॅंकांमधील आर्थिक व्यवहार आज पूर्णपणे बंद होते. 
 
यासाठी पुकारला संप 

अधिकारी- कर्मचाऱ्यांचा दहावा वेतन करार नोव्हेंबर 2017 पासून प्रलंबित असून, युनायटेड फोरम व आयबीए यांच्यात झालेल्या बैठकीत कोणतीही मागणी मान्य न करता 2 टक्के पगारवाढीची ऑफर देऊन बॅंक कर्मचाऱ्यांची आयबीए व सरकारने थट्टा केली आहे. सरकारच्या या धोरणाच्या निषेधार्थ हा संप पुकारण्यात आला आहे. 
 
500 कोटींचे व्यवहार ठप्प 
संपाच्या पार्श्‍वभूमीवर बॅंकांनी ग्राहकांची गैरसोय होऊ नये म्हणून सर्व एटीएम रोखीने भरले होते. त्यामुळे किमान आज तरी ग्राहकांना अडचण जाणवली नाही. मात्र, बॅंकांमधील रोखीचे व आर्थिक असे मोठे व्यवहार पूर्णतः ठप्प झाले होते. 500 ते 550 कोटींचे "क्‍लिअरिंग' होऊ शकले नाहीत, असे सांगितले जात आहे. गुरुवारीही अशीच स्थिती कायम राहणार आहे. 

Web Title: marathi news jalgaon bank karmchari samp