पैसे घेऊन बेकायदा बांधकामांना परवानगी 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 मार्च 2018

पैसे घेऊन बेकायदा बांधकामांना परवानगी 
जळगाव ः नगररचना विभागातील अधिकारी पैसे घेऊन बेकायदा व चुकीच्या बांधकामांना परवानगी देतात. त्यामुळे या ठिकाणी गटारी, रस्ते बांधण्यासाठी अडचणी निर्माण झाल्या आहेत, असा आरोप महापालिकेच्या स्थायी समितीच्या आज झालेल्या सभेत सदस्यांनी केला. या मुद्यावरून सर्व सदस्य चांगलेच आक्रमक झाले. 
दरम्यान, धांडेनगरमध्ये एकाने भिंत बांधून रस्त्यात तीन मीटर जागेवर अतिक्रमण केले असून, नगररचना विभागातील एक निवृत्त अधिकारी आणि बांधकाम व्यावसायिक यांच्या संबंधातून प्रकार घडला आहे, असा आरोप माजी सभापती नितीन बरडे यांनी केला. 

महापालिका स्थायी समितीची सभा सभापती ज्योती इंगळे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी अप्पर आयुक्त चंद्रकांत खोसे, प्रभारी उपायुक्त राजेश कानडे, शहर अभियंता डी. बी. दाभाडे, नगरसचिव अनिल वानखेडे उपस्थित होते. सभेत श्री. बरडे म्हणाले, की धांडेनगर, कृपाळू हनुमान मंदिर परिसर, स्टेट बॅंक कॉलनी, पवन हिल्स हा रहिवासी भाग नव्याने विकसित झाला आहे. तेथे कच्चे रस्ते व गटार असून, पक्‍क्‍या गटारींचे 52 लाखांचे काम नुकतेच मंजूर झाले आहे. येत्या 15 ते 20 दिवसांत कामाला सुरवात होणार आहे; परंतु या भागातील अतिक्रमणामुळे या कामात अडथळे येत आहेत. अधिकाऱ्यांनी चुकीच्या बांधकामास परवानगी दिल्याने या समस्या निर्माण झाल्या आहेत. अशा अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्‍चित करून कारवाई करावी, अशी सूचना त्यांनी केली. 
------------------------------------- 

नोटिसा बजावूनही कारवाई नाही 
बांधकाम परवानगी आणि पूर्णत्वाचे दाखले देताना रस्त्याच्या रुंदीकरणाकडे नगररचना विभागातील अधिकारी दुर्लक्ष करतात. विचारणा केली असता, 13 जणांना नोटिसा बजावण्यात आल्या, असे सांगतात. पण, प्रत्यक्षात कार्यवाही केलेली नाही. "नगररचना'मधील एका निवृत्त अधिकाऱ्याची बिल्डरबरोबर भागीदारी आहे. त्यामुळे "नगररचना'त आर्थिक गैरव्यवहार होत असल्याचा आरोप श्री. बरडे यांनी सभेत केला. यावर अप्पर आयुक्त खोसे यांनी श्री. बरडे यांच्या तक्रारीची दखल घेऊन अहवाल आयुक्तांना सादर करण्याचे निर्देश नगररचना विभागाला दिले. 
------------------------------------- 

Web Title: marathi news jalgaon bekayda