गुन्हेगाराने जेलमध्ये रचला बनावट "बेल'चा खेळ..! 

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 16 मे 2018

गुन्हेगाराने जेलमध्ये रचला बनावट "बेल'चा खेळ..! 

जळगाव: अमळनेर येथील डॉक्‍टरपुत्राच्या अपहरणातील आरोपींना उच्च न्यायालयातून जामीन मिळवून देण्याचे आमिष दाखवत त्यासंबंधी बनावट प्रती सादर करून अट्टल गुन्हेगाराने कारागृहातील आरोपींची चाळीस हजारांत फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 

गुन्हेगाराने जेलमध्ये रचला बनावट "बेल'चा खेळ..! 

जळगाव: अमळनेर येथील डॉक्‍टरपुत्राच्या अपहरणातील आरोपींना उच्च न्यायालयातून जामीन मिळवून देण्याचे आमिष दाखवत त्यासंबंधी बनावट प्रती सादर करून अट्टल गुन्हेगाराने कारागृहातील आरोपींची चाळीस हजारांत फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 

अमळनेर येथील डॉ. निखिल बहुगुणे यांचा मुलगा पार्थ (वय 12) याच्या अपहरण प्रकरणातील मुख्य सूत्रधार महेश विनायक खांजोळकर (बारी, वय-33, रा. बालाजीपुरा, अमळनेर), सुनील वामन बारी (वय 36 ), भरत दशरथ महाजन (वय 24 ), शिवम गुलाब शिंगाने (वय 19 ), अनिल नाना भिल (वय 20 , सर्व रा. अमळनेर), भटू हिरामण बारी (रा. बडोदा, गुजरात) कारागृहात आहेत. 

अमोलशी झाली ओळख 
जिल्हा कारागृहात त्यांच्या बॅरेकमध्ये मोटारसायकल चोरीतील अट्टल गुन्हेगार अमोल बेलप्पा आखाडे ऊर्फ अर्जुनकुमार बेलप्पा वाणी (वय-32, रा.नशिराबाद) होता. यादरम्यान सुनील खांजोळकर याच्याशी मैत्री करून आपली औरंगाबादच्या वकिलांशी ओळख असून त्यांच्यामार्फत खंडपीठातून जामीन मंजूर करून आणण्याचे आश्‍वासन अमोलने सुनीलला दिले. अमोलला जामीन मिळाल्यावर बारी यांचे वयोवृद्ध बंधू नितीन बारी यांना अमोल आखाडे जामिनासाठी प्रयत्न करणार आहे, लागणारे पैसे व सर्व मदत करण्याचे जेलमधून कुटुंबीयांकडून सांगण्यात आल्याने त्यांनी आखाडेवर विश्‍वास ठेवत दस्तऐवज आणि खर्चासाठी वारंवार पैसे दिले. 
----- 
चाळीस हजारांत ऑर्डर 
अमोलने बारी कुटुंबीयांच्या घरी अमळनेरला जाऊन वेळोवेळी खर्चाला पैसे घेतले. औरंगाबाद येथील नामवंत वकील ऍड. सतेज जाधव यांच्याशी ओळखी असल्याचे सांगत जामिनासाठी 40 हजार रुपयेही उकळले. नंतर, दोन दिवसांनी औरंगाबाद उच्च न्यायालयाच्या जामिनाचा आदेश असलेले बंद लिफाफे आणून दिले व धावपळ करावी लागते म्हणून अमोलने बारींची दुचाकी (एमएच 19-7034) घेऊन पोबारा केला आहे. 
------ 
...असा आला प्रकार समोर 
दरम्यान, हे आदेश घेऊन नितीन बारींनी कारागृह गाठले. मात्र, त्यांना अमळनेर न्यायालयात जाण्याचा सल्ला मिळाल्याने त्यांनी वकिलाशी संपर्क केला. संबंधित वकिलाने औरंगाबाद येथे ऍड. सतेज जाधव यांना संपर्क केल्यावर त्यांनी अशा आदेशाबाबत स्पष्ट शब्दात नकार दिल्यावर मात्र वकीलही हबकले. उच्च न्यायालयाच्या संकेतस्थळावर असे आदेशच नव्हते. तेव्हा हे आदेश बनावट असल्याचा प्रकार समोर आला. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करणार असल्याचे नितीन बारी यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले. 
 

Web Title: marathi news jalgaon bel