बेलगंगा' विक्रीवरचे आक्षेप कोर्टाने फेटाळले 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 एप्रिल 2018

चाळीसगाव ः कामगारांची थकीत देणी मिळावी व बेलगंगा कारखाना दीडशे कोटींचा असताना तो केवळ 40 कोटींत विकत घेतल्यामुळे त्याची विक्री प्रक्रिया रद्द करावी, अशी मागणी करणारी कामगार युनियनची याचिका आज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. या निर्णयामुळे बेलगंगाच्या विक्री प्रक्रियेवर कामगारांनी घेतलेले आक्षेप निकाली निघाले आहेत. 

बेलगंगा साखर कारखान्यावर जिल्हा बॅंकेचे कर्ज असल्याने बॅंकेने केंद्र सरकारच्या कंपनीमार्फत ई- निविदा प्रक्रियेद्वारे हा कारखाना विक्रीला काढला होता. या प्रक्रियेत येथील भूमिपुत्रांनी स्थापन केलेल्या अंबाजी ट्रेडिंग कंपनीने सहभाग घेऊन बॅंकेच्या अटी व शर्तींना बांधील राहून 40 कोटींत कारखाना विकत घेतला. या प्रक्रियेच्या विरोधात कामगार संघटनेने आपली देणी मिळावी व कमी किमतीत कारखाना विकल्याने विक्री प्रक्रिया रद्द करावी, अशी मागणी करणारी याचिका न्यायालयात दाखल केली. मुंबई उच्च न्यायालयाने आधी त्यांची याचिका फेटाळली. त्यानंतर कामगारांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. 

बेलगंगा कारखाना दीडशे कोटींचा आहे आणि कोणी 75 कोटी देणार असेल, तर अंबाजी कंपनी या प्रक्रियेत भागच घेणार नाही, असे कंपनीतर्फे ऍड. धनंजय ठोके यांनी न्यायालयाला सांगितले. त्यावर न्यायालयाने कुठलेही भाष्य न करता, कामगारांनी त्यांच्या देणीसंदर्भात कामगार न्यायालयात याचिका दाखल करावी, असा निर्णय दिला. अर्थात कारखाना विक्रीच्या प्रक्रियेवरील सर्वच आक्षेप न्यायालयाने फेटाळले.

Web Title: marathi news jalgaon belganga court