भाषा, चालीरीती अनुभवण्यासाठी "भारत परिक्रमा' 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 मे 2018

जळगाव, ता. 10 ः भारतातील प्रत्येक राज्यात वेगळी भाषा बोलली जाते. वेगवेगळ्या चालीरीती व संस्कृती आहे. हे आतापर्यंत ऐकले आहे. पण हे प्रत्यक्ष अनुभवायचे होते. यात फिरण्याची हौस असल्याने याच निमित्तातून भाषा, चालिरीतींचा जवळून अनुभव घेण्याच्या उद्देशाने देशाच्या सर्व बाजूंच्या सीमेवरील भागातून जाऊन "भारत परिक्रमा' करण्याचे निश्‍चित केल्याचे किशोर व संध्या पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. 

जळगावातील रहिवासी असलेल्या पाटील दाम्पत्याने आपल्या 14 वर्षीय मुलगा वास्तव पाटील यास सोबत घेऊन "भारत परिक्रमा' करण्याचे निश्‍चित केले आहे. याबद्दल बोलताना संध्या पाटील म्हणाल्या, की फिरण्याची हौस असल्याने वर्षभरातून एक- दोन वेळेस फिरण्याच्या निमित्ताने धार्मिकस्थळी दर्शन घेत असतो. परंतु, यावेळेस जरा वेगळे करण्याचा विचार आणि भारतातील भाषा, चालीरीती जाणून घेण्यासाठी "भारत परिक्रमा' करण्याचे ठरविले. जे आतापर्यंत कोणी कुटुंबाने सोबत केलेले नाही. साधारण 18 हजार किलोमीटरपेक्षा अधिक अंतराची ही परिक्रमा 65 किंवा त्यापेक्षा अधिक दिवसांची असणार आहे. शिवतीर्थ मैदानापासून रविवारी (13 मे) सकाळी आठला निघून वणीचा गड व तेथून पालीचा गणपती येथे दर्शन घेऊन परिक्रमेला सुरवात होईल. यानंतर कोकण- रत्नागिरी- पणजी मार्गाने भारत देशाच्या सीमेलगतच्या भागातून जाऊन परिक्रमा पूर्ण करून अहमदाबाद- बडोदाहून मुंबई व पुन्हा पालीचा गणपती येथे येऊन परिक्रमेचा समारोप होईल. अठरा हजार किलोमीटरपेक्षा अधिक अंतराच्या परिक्रमेत रोज किमान 250 ते 300 किलोमीटर अंतराचा प्रवास केला जाणार आहे. 

प्रत्येक राज्यातून आणणार माती अन्‌ पाणी 
"भारत परिक्रमा' करताना प्रत्येक राज्यातील भाषा, संस्कृती जाणून घेण्यात येणार आहे. तसेच "सारे भारतीय एक आहोत' यानुसार पंधरा भाषांमध्ये "भारत माझा देश आहे' हे लिहून आणणार असल्याचे किशोर पाटील यांनी सांगितले. तसेच परिक्रमेत जितके राज्य लागतील तेथील माती आणि पाणी सोबत आणणार आहे. परिक्रमा पूर्ण करून जळगावात आल्यानंतर सोबत आणलेली माती एकत्र करून त्यातून प्रत्येक राज्याची माती वेगळी करण्याचे नागरिकांनाच सांगून आपण भारतीय वेगळे नसून एकच असल्याचे दाखविण्याचा प्रयत्न राहणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.

Web Title: marathi news jalgaon bharat parikrama patil family