परिक्रमेतून आदीवासींच्या शिक्षणांचे "नर्मदालय' : भारती ठाकूर यांनी उलगळला प्रवास

bharti thakur
bharti thakur

जळगाव : नर्मदा परिक्रमा करण्यासाठी गेले असताना ओंकारेश्‍वर डॅममधील पाण्याखाली जमिन जाणार म्हणून सुरू असलेली वृक्षतोड थांबविण्याचा विचार आला. याच दरम्यान परिसरात खेड्यातल्या आठवीत गेलेल्या मुलांना त्यांचे नाव देखील लिहीता येत नसल्याचे वास्तव समोर आले. त्यावेळपासून अशा मुलांना शिकवण्यासाठी सुरवात केली. यातूनच आदीवासी भागात शिक्षणाचे "नर्मदालय' उभे राहिल्याचे भारती ठाकूर यांनी सांगिलते. 
केशवस्मृती प्रतिष्ठानतर्फे जाहीर करण्यात आलेल्या आचार्य अविनाशी पुरस्कार वितरण सोहळ्यापुर्वी आयोजित पत्रकार परिषदेतून संवादा साधताना भारती ठाकूर यांनी आपला प्रवास उलगडला. त्यांनी सांगितले, की आयुष्याची सरळ, साधी, सोपी वाट आमूलाग्र बदलण्यास कारणीभूत ठरली ती म्हणजे नर्मदा परिक्रमा. नर्मदा नदीच्या परिसरातील जैविक संपदा धरणांच्या पाण्याखाली जाण्याआधी डोळे भरून पाहून घेण्याच्या उद्देशाने परिक्रमा केली. त्यावेळी नर्मदेच्या किनाऱ्यावरील वस्त्यावस्त्यांमधून जात असताना, तिथल्या ग्रामवासीयांबरोबर संवाद साधला. महेश्वर तालुक्‍यातील मंडलेश्वर गावाजवळ होत असलेल्या श्रीमहेश्वर वीजनिर्मिती प्रकल्पामुळे 22 गावे बुडणार असल्याचे सांगितले जात होते. पंरतु गेल्या पंधरा- वीस वर्षांपासून ना गावे बुडाली आणि त्यामुळे विकास देखील झाली नाही. 

अन्‌ पोटार्थी म्हणून जगणे थांबविले 
शेतजमीन गेल्यामुळे मजुरीसाठीदेखील आसपास शेत उरली नव्हते. पुढच्या पिढीने उपजीविकेसाठी काय करायचं? शिवाय बहुतांश खेड्यांमध्ये फक्त प्राथमिक/ माध्यमिक (आठवीपर्यंत) शाळा होती. विशेष म्हणजे आठवीपर्यंत शिकूनही मुलांना स्वत:चे नावदेखील लिहिता येत नाही; याची जाण मुलांशी संवाद साधल्यानंतर झाली. तेव्हाच निश्‍चय केला की परिक्रमा पूर्ण झाल्यावर परिसरात बाल शिक्षणाच्या क्षेत्रात काम सुरू करायचे ठरविले. म्हणजेच पोटार्थी म्हणून जगणे थांबविले आणि 26 जुलै 2009 ला मंडेश्‍वरी येथे येवून दोन- तीन मुलांना शिकविण्यास सुरवात केली. चौदा मुले सुरवातीला होती; ती दीड महिन्यात 132 झाली. म्हणजेच शिक्षण आनंददायी असले तर मुलांना देखील शिक्षणाची गोडी लागत असल्याचा अनुभव येथे आला. एका गावातून सुरू झालेले पंधरा गावात 1700 मुलांना शिक्षण देण्यापर्यंत पोहचल्याचे त्यांनी सांगितले. 

म्हणून नोकरी सोडून भिकाऱ्यांसाठी काम ः डॉ. सोनवणे 
भिक्षेकरांचे डॉक्‍टर म्हणून ओळख आज निर्माण झाली. मंदिरांबाहेर भिक मागणाऱ्यांचे औषधोपचार करण्यासोबत त्यांना कष्टकरी करावे नंतर गावकरी बनविण्याचा मानस आहे. पण याची सुरवात एका भिकारी आजोबांनी जगण्याच्या दिलेल्या मंत्राने झाली. त्यांनी सांगितले होते, की पॅथीने शरीर बरे होवू शकते माणूस बरा होत नसतो. हा जगण्याचा मंत्र घेवून भिकाऱ्यांसाठी काम करण्यास सुरवात केल्याचे डॉ. अभिजीत सोनवणे व डॉ. मनिषा सोनवणे यांनी सांगितले. सुरवातीला मंदिरांबाहेर केवळ निरीक्षण करत राहिलो. हळूहळू त्यांच्याशी संवाद साधण्यास सुरवात केली आणि 2015 मध्ये नोकरी सोडून कामाला लागलो. काय करायचे हे निश्‍चित नव्हते; पण सुरवातीला औषधी दिली. नंतर त्यांना भिक मागण्यापेक्षा स्वतःच्या पायावर उभे करण्याचा प्रयत्न केला. यासाठी स्वतः भांडवल उभे करून दिले. आजपर्यंत 1100 जणांपर्यंत पोहचलो असून यातील 52 मुलांना शाळेत टाकले, 16 जणांना वृद्धाश्रमात सोय केली. तर 65 लोकांना भिकेतून बाहेर काढून कष्टकरी करण्यात यश मिळाल्याचे डॉ. सोनवणे यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com