"मविप्र'च्या ताब्याचा वाद पेटला : भोईटे-पाटील गटाच्या समर्थकांत हाणामारी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 19 जून 2018

जळगाव : मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या ताब्यावरुन सुरु असलेला वाद आज चांगलाच पेटला दुपारी संस्थेचा ताब्या घेण्यावरुन नरेंद्र पाटील व भोईटे गटातील समर्थक एकमेकांशी भिडले. दोघा गटाच्या समर्थकांमध्ये तुफान हाणामारी व दगडफेक झाली, त्यात दोन जण जखमी झाले. पोलिसांनी दोघाही गटातील समर्थकांना झोडपून काढत स्थितीवर नियंत्रण मिळविले. 

जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक संस्थेवरील ताब्यासाठी गेल्या तीन महिन्यांपासून नरेंद्र पाटील व भोईटे गटात वाद सुरु आहे. संस्थेच्या ताब्यावरुन पोलिसांनी दोघा गटांना संस्थेच्या कार्यालयात जाण्यास मज्जाव केला होता. तेव्हापासून हे प्रकरण चांगलेच चिघळले आहे. यासंदर्भात तहसीलदारांनी नुकत्याच दिलेल्या आदेशावरुन पाटील गटाने रविवारी संस्थेच्या कार्यालयाचा ताबा घेत कामकाज सुरु केले. मात्र, आज पुन्हा भोईटे गटाने त्यास आक्षेप घेतला. दुपारी दोन्ही गटांचे समर्थक समोरासमोर भिडले व त्यांच्यात जोरदार हाणामारी, दगडफेक झाली. यात दोन-तीन जण जखमी झाले असून पोलिसांनी स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी दोन्ही गटातील समर्थकांना झोडपून काढले.

Web Title: marathi news jalgaon bhoite patil gut