‘भोंगा‘ चित्रपटास राष्ट्रीय पुरस्काराने मांदर्णे येथे ग्रामस्थांचा जल्लोष 

दीपक कच्छवा
शनिवार, 10 ऑगस्ट 2019

मेहुणबारे (ता.चाळीसगाव) ः राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त दिग्दर्शक शिवाजी लोटन पाटील यांच्या ‘धग' चित्रपटानंतर ‘भोंगा‘ या चित्रपटासाठी दुसऱ्यांदा सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. यामुळे त्यांच्या मूळगावी मांदुर्णे (ता. चाळीसगाव) येथे ग्रामस्थांनी फटाके वाजवून आनंद व्यक्त केला. 

मेहुणबारे (ता.चाळीसगाव) ः राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त दिग्दर्शक शिवाजी लोटन पाटील यांच्या ‘धग' चित्रपटानंतर ‘भोंगा‘ या चित्रपटासाठी दुसऱ्यांदा सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. यामुळे त्यांच्या मूळगावी मांदुर्णे (ता. चाळीसगाव) येथे ग्रामस्थांनी फटाके वाजवून आनंद व्यक्त केला. 

‘भोंगा‘ या मराठी चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार आज जाहीर करण्यात आला. ‘भोंगा‘ चित्रपटाची कथा, पटकथा आणि दिग्दर्शन शिवाजी लोटन पाटील यांचे आहे. तर, निशांत धापसे यांनी या चित्रपटाचे संवाद लिहिले आहेत. रमणीरंजन दास यांनी या चित्रपटाचे छायांकन केले आहे. नीलेश गावंड यांचे संकलन आहे. सुबोध पवार यांनी चित्रपटासाठी गीत लेखन केले आहे. ६६ व्या राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्यात 'भोंगा' सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला. 
नलिनी प्रोडक्शनसची निर्मिती असलेल्या या चित्रपटाचे निर्माते शिवाजी लोटन पाटील व अरुण महाजन आहेत. चित्रपटाचे कलादिग्दर्शन संतोष समुद्रे यांचे आहे. महेंद्र टिसगे हे ‘भोंगा‘चे कार्यकारी निर्माते आहेत. ‘भोंगा‘ चित्रपटास पुरस्कार मिळाल्याची बातमी समजल्यानंतर दिग्दर्शक शिवाजी लोटन पाटील यांनी आनंद व्यक्त केला. 

तीन चित्रपटांचे चित्रीकरण मांदुर्णे येथे 
शिवाजी लोटन पाटील यांनी दिग्दर्शित केलेले वावळट, धग, हलाल व भोंगा यापैकी 
धग, हलाल, ‘भोंगा‘ या चित्रपटांचे चित्रीकरण मांदुर्णे (ता. चाळीसगाव) येथे करण्यात आलेले आहे. यामुळे गावात फटाके फोडून ग्रामस्थांनी आनंदोत्सव साजरा केला. 

दुसऱ्यांदा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाल्याने अत्यानंद झाला आहे. माझ्यासह माझ्या सर्व टीमचं हे श्रेय आहे. पुरस्कारामुळे आता येणाऱ्या नव्या चित्रपटांसाठी आणखी बळ मिळालं आहे. 
- शिवाजी लोटन पाटील, दिग्दर्शक, रा. मांदुर्णे, ता. चाळीसगाव 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon bhonga film national award