भुसावळला भाजप-जनआधारमध्ये तु..तु..मै..मै.. 

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 23 मे 2018

भुसावळला भाजप-जनआधारमध्ये तु..तु..मै..मै.. 
 
भुसावळ : भुसावळ पालिकेला फास्टर मुव्हर क्‍लीननेस सिटीचा पुरस्कार मिळाल्याच्या पार्श्‍वभुमीवर शहरात स्वच्छतेची चित्रफीत काढण्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आज दुपारी तु...तु...मै...मै... झाली. यामुळे पालिकेतील राजकारण ढवळून निघाले आहे. 

भुसावळला भाजप-जनआधारमध्ये तु..तु..मै..मै.. 
 
भुसावळ : भुसावळ पालिकेला फास्टर मुव्हर क्‍लीननेस सिटीचा पुरस्कार मिळाल्याच्या पार्श्‍वभुमीवर शहरात स्वच्छतेची चित्रफीत काढण्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आज दुपारी तु...तु...मै...मै... झाली. यामुळे पालिकेतील राजकारण ढवळून निघाले आहे. 
नुकत्याच झालेल्या स्वच्छ सर्व्हेक्षणात भुसावळ पालिकेला फास्टर मुव्हर क्‍लीननेस सिटीचा पुरस्कार मिळाला. दिल्ली येथे हा पुरस्कार पालिकेला देणार आहे. देशातील चार हजारांपेक्षा जास्त शहरांचे सर्व्हेक्षण हैदराबाद येथील कार्वी एजन्सीने केले होते. त्यापार्श्‍वभुमीवर या कंपनीचे चार प्रतिनिधी आज भुसावळला आले. दिल्ली येथे पुरस्कार वितरणा दरम्यान स्वच्छेबाबतची चित्रफित या कंपनीतर्फे दाखविणार आहे. 
या अनुषंगाने आज या प्रतिनिधींनी दिनदयाळ नगरातील स्वच्छतेबाबतच्या चित्रीकरणाला सुरुवात केली. तेव्हा जनआधार विकास पार्टीचे नगरसेवक दुर्गेश ठाकुर यांनी त्यांना विरोध करुन केवळ स्वच्छतेचे चित्रीकरण करण्यापेक्षा अस्वच्छतेचेसुध्दा चित्रीकरण करा असे सुचविले. यावरुन भाजपचे नगरसेवक महेंद्रसिंग ठाकुर आणि दुर्गेश ठाकुर यांच्यात शाब्दीक चकमक उडाली. ही चकमक चित्रीकरण करणाऱ्यांचे कॅमेरे ओढण्यापर्यंत पोहोचली. 
ते पाहून चित्रीकरण करणारे प्रतिनिधींनी पालिका गाठली आणि मुख्याधिकारी बी. टी. बाविस्कर यांना घडल्या प्रकाराची माहिती दिली. यावेळी नगराध्यक्ष रमण भोळे, माजी उपनगराध्यक्ष युवराज लोणारी, ऍड. बोधराज चौधरी, शहराध्यक्ष पुरुषोत्तम नारखेडे, किरण कोलते, परिक्षित बऱ्हाटे आदी भाजपचे नगरसेवक उपस्थित होते. 
पालिका प्रवेशद्वारासमोर याप्रकारावरुन मुख्याधिकारी आणि जनआधार विकास पार्टीचे सिकंदर खान यांच्या वाद झाला. विरोधी गटनेते उल्हास पगारे, दुर्गेश ठाकुर यांनीही केवळ स्वच्छतेचेच चित्रिकरण का करतात असा प्रश्‍न विचारला. यावर नगराध्यक्ष रमण भोळे यांनी दिल्ली येथे या चित्रफितीत केवळ स्वच्छताच दाखविली जाणार आहे. चित्रिकरण करणारी टिम दिल्लीहून आली असल्याचे स्पष्ट केले. याप्रसंगी दोन्हीकडील नगरसेवकांमध्ये शाब्दीक चकमक उडाली. 
 

Web Title: marathi news jalgaon bhusawal