पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची गाडी अडवून दाखविले काळे झेंडे 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 1 ऑक्टोबर 2018

भुसावळ : फैजपूर येथे अटल कृषी महाशिबिरासाठी जाताना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा ताफा भुसावळला भारिप बहूजन महासंघाच्या कार्यकर्त्यांनी अडवून त्यांना काळे झेंडे दाखविले. आज सकाळी अचानक घडलेल्या या घटनेने सुरक्षा यंत्रणांची शहरात चांगलीच तारांबळ उडाली. याबाबत पालकमंत्र्यांशी संपर्क साधला असता याबाबत आपल्याला काहीएक कल्पना नसल्याचे सांगितले. 

राज्याचे महसुल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील जिल्हा दौऱ्यावर आहेत. आज सकाळी फैजपूरला शासकिय कार्यक्रमासाठी भुसावळहून जात असताना भारीप बहुजन महासंघाच्यावतीने पालकमंत्र्यांची गाडी अडवून काळे झेंडे दाखविले. या प्रकारानंतर बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या सुरक्षा रक्षकांनी तातडीने आंदोलकांना रस्त्याच्या बाजूला केले. तर शहर पोलिसांनी दहा आंदोलकांना ताब्यात घेतले. भारीप बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे, दिनेश इखारे, संजय सुरडकर आदी आंदोलनात सहभागी झाले. जिल्ह्याला पूर्णवेळ पालकमंत्री नसल्याने व चंद्रकांत पाटील यांच्याकडे दोन जिल्ह्यांचा पालकमंत्री पदाचा पदभार असल्याने त्यांनी तातडीने राजीनामा द्यावा, अशा घोषणा कार्यकर्त्यांनी यावेळी दिल्या. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon bhusawl chandrakant patil