वनपालासह दोन शेतकऱ्यांवर बिबट्याचा हल्ला 

वनपालासह दोन शेतकऱ्यांवर बिबट्याचा हल्ला 

जळगाव: तालुक्‍यातील देऊळवाडा शिवारामधील शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांसह शोध घेणाऱ्या वनपालावर बिबट्याने हल्ला केला. यामध्ये तीघांना बिबट्याने चावा घेत जखमी केले. दरम्यान जिल्हा वैद्यकीय रुग्णालयात तीघांवर उपचार सुरु आहे. 

जळगाव तालुक्‍यातील देऊळवाडे शिवारात असलेल्या शेतात प्रमोद संजय सोनवणे (वय 18) हा सकाळी 9 वाजेच्या सुमारास कडबा घेण्यासाठी गेला होता. कडबा घेवून घरी येत असतांना ज्वारीच्या शेतात पाणी पित असलेल्या बिबट्याने प्रमोद सोनवणेवर हल्ला केला. प्रमोदला कवटाळलेल्या बिबट्याने दंड, मानेवर व पाठीवर चावा घेवून त्याला जखमी केले. प्रमोद याने हल्लेखोर बिबट्याचा प्रतिकार करीत त्याला जोरदार ठोसा मारला असता. बिबट्याने त्याठिकाणाहून पसार झाला प्रमोद याने आपल्यावर बिबट्याने हल्ला केल्याची माहिती प्रकाश शालिक सोनवणे याला दिली. प्रकाश याने प्रमोदला तात्काळ उपचारासाठी जिल्हा वैद्यकीय रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर दुपारी 12.30 वाजेच्या सुमारास शेतात काम करीत असलेले देवचंद लक्ष्मण सोनवणे (वय 57, रा. देऊळवाडे) हे देखील शेतात काम करीत असतांना त्यांच्यावर देखील त्याच बिबट्याने हल्ला केला. देवचंद यांनी देखील बिबट्याचा प्रतिकार करीत त्याला हुसकावून लावले. अन्यथा त्यांना देखील बिबट्‌याने गंभीर जखमी केले असते. बिबट्याच्या हल्ल्यातील जखमींवर तात्काळ जिल्ह वैद्यकीय रुग्णालयात उपचार सुरु असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com