देऊलवाडे परिसरातून बिबट्या पसार; वन अधिकाऱ्यांचा अंदाज 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 15 मार्च 2019

जळगाव : देऊलवाडे (ता. जळगाव) शिवारात बिबट्याने वनपालासह तिघांवर हल्ला करून जबर जखमी केले होते. या प्रकरणी वनविभागाकडून कसून शोध घेतला जात आहे. आज तिसऱ्या दिवशीही वन विभागाच्या पथकाने परिसर पिंजून काढला. लावलेल्या कॅमेऱ्यात कुठेही बिबट्या टिपला गेलेला नाही. हा जंगल बिबट्याने सोडला असावा असा अंदाज आरएफओ एन. जी. पाटील यांनी वर्तविला आहे. 

देऊलवाडे व सुजदा शिवारात पाण्याच्या शोधार्थ बिबट्या आला असावा असे मत वन्यप्रेमींकडून व्यक्त होत आहे. बिबट्याने वनपाल श्री. बडगुजर तसेच दादर कापत असलेला शेतकरी प्रमोद संजय सोनवणे व देवचंद लक्ष्मण सोनवणे यांच्यावर हल्ला करून जखमी केले आहे. या दोघं काका पुतण्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 
वनविभागाने या परिसरात रेस्क्‍यू ऑपरेशन राबवून परिसरात दोन पिंजरे व सहा कॅमेरे लावले होते. परंतु बिबट्या कॅमेऱ्यात दिसून न आल्याने बिबट्या दुसरीकडे निघून गेल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. तसेच रेस्क्‍यू ऑपरेशनमध्ये कुठेही बिबट्याचे पगमार्क मिळून आले नाही. तसेच बिबट्या दररोज 200 किलोमीटरपर्यंत फिरत असल्याने बिबट्या नक्कीच परिसर सोडून निघून गेल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

Web Title: marathi news jalgaon bibtya devulvade forest officer