भुसावळला सहा लाखांचे बिबट्याचे कातडे जप्त

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 10 मे 2018

भुसावळ : वन्यप्राण्यांची तस्करी करणाऱ्या चार संशयितांना वनविभागाने आज सापळा रचून शहरातील नहाटा कॉलेज चौफुलीजवळ दुपारी चारला पकडले. संशयितांकडून सहा लाख रुपये किमतीचे बिबट्याचे कातडे, तीन मोटारसायकली असा एकूण पावणे सात लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. संशयितांना उद्या (ता. 10) न्यायालयात हजर करणार आहेत. 

वन्य प्राण्यांची तस्करी करणाऱ्यांची टोळी भुसावळला येणार असल्याची गुप्त माहिती मिळाल्यावरून मुक्ताईनगरचे वनक्षेत्रपाल पी. टी. वराडे, संरक्षण व अतिक्रमण निर्मूलनचे वनक्षेत्रपाल डी. जी. पवार यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव, मुक्ताईनगर व पारोळा वनक्षेत्राच्या पथकाने सापळा रचला. नहाटा कॉलेज चौफुलीवर आज दुपारी चारला कृष्णकुमार अमरसिंग नेस (वय 31, रा. बऱ्हाणपूर, मध्यप्रदेश), नंदकिशोर रामचंद्र खवले (वय 42, रा, अमळनेर), दिलीप अमरसिंग नेस (वय 42,रा बऱ्हाणपूर), सुरेश झाल्टे (वय 29, रा. बोरखेडा, बुलडाणा) यांच्या संशयास्पद हालचाली आढळल्या. वनपथकाने त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे सहा लाख रुपये किमतीचे बिबट्याचे कातडे मिळून आले. संशयितांविरुद्ध वन्यजीव संरक्षण अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला आहे. तपास पी. टी. वराडे करीत आहे. 

Web Title: marathi news jalgaon bibtya skin