Vidhan sabha : जिल्ह्यात भाजपतर्फे महाजन, खडसेंसह चार उमेदवार निश्‍चित 

Vidhan sabha : जिल्ह्यात भाजपतर्फे महाजन, खडसेंसह चार उमेदवार निश्‍चित 

जळगाव : भारतीय जनता पक्षातर्फे उमेदवारांची अंतिम यादी लवकरच जाहीर होणार आहे. मात्र, जळगाव जिल्ह्यात जलसंपदामंत्री गिरीश महाजन, माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्यासह चार उमेदवार निश्‍चित झाले असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. 
भारतीय जनता पक्ष जळगाव जिल्ह्यात मजबूत आहे. परिणामी, पक्षातर्फे विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडे इच्छुकांची मोठ्या प्रमाणात गर्दी आहे. त्यामुळे भाजपची उमेदवारी कोणाला मिळणार, याकडेच सर्वांचे लक्ष आहे. जिल्ह्यातील भाजपचे नेते व माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या मुक्ताईनगर मतदारसंघातील उमेदवारीबाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण करण्यात आले होते. त्यांच्याऐवजी त्यांच्या कन्या जिल्हा बॅंकेच्या अध्यक्षा ऍड. रोहिणी खडसे-खेवलकर यांना उमेदवारी मिळण्याची चर्चा सुरू झाली होती. मात्र, एकनाथराव खडसे यांनी माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत आपणच लढणार आहोत, असे ठामपणे सांगितले आहे. त्यामुळे या मतदारसंघातून कोणाला उमेदवारी मिळणार, याकडेच अधिक लक्ष होते. मात्र, आता पक्षातर्फे मुक्ताईनगरातून एकनाथराव खडसे यांनाच पुन्हा उमेदवारी देण्याचे निश्‍चित झाले असल्याचे सांगण्यात येत आहे. याशिवाय, जामनेर येथून विद्यमान जलसंपदामंत्री गिरीश महाजन हे निश्‍चितच आहे. मध्यतंरी ते पाचोरा किंवा जळगाव येथून लढण्याची चर्चाही सुरू झाली होती. मात्र, ते आता जामनेर येथूनच लढणार असल्याचे निश्‍चित झाले आहे. भुसावळ येथून आमदार संजय सावकारे यांची उमेदवारीला कात्री लावण्यात येणार असल्याची चर्चा होती. मात्र, पक्षाने आता त्यांच्याच नावावर शिक्कामोर्तब केले असल्याचे सांगण्यात येत आहे. जळगाव शहर विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार सुरेश भोळे यांना पक्षातर्फे पुन्हा उमेदवारी देण्याचे निश्‍चित झाले आहे. 

गुरुवारी भरणार अर्ज 
जिल्ह्यात भाजपचे चार उमेदवार निश्‍चित झाले आहेत. चारही उमेदवारांनी उमेदवारी अर्ज भरण्याचे निश्‍चित केले असून, गुरुवार (ता.3) ते अर्ज भरणार आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com