भविष्य घडवायचे असेल, तर भाजप हाच पर्याय : जलसंपदामंत्री महाजन 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 जुलै 2018

जळगाव ः देशात ज्याप्रमाणे 60 वर्षे सत्ता गाजविणाऱ्या कॉंग्रेसला जनतेने पराभूत करून दिल्लीपासून गल्लीपर्यंत भाजपवर विश्‍वास टाकला, त्याचप्रमाणे जळगाव महापालिकेतही गेल्या 35 वर्षांपासून एकाच जणाकडे असलेल्या सत्तेत बदल घडवून भाजपवर विश्‍वास टाकावा. महापालिकेत एकहाती सत्ता असल्याने जळगावात पायाभूत सुविधांचे प्रश्‍न निर्माण झाले आहेत. हे प्रश्‍न सोडवून जळगावचे भविष्य घडवायचे असेल, तर भाजपशिवाय पर्याय नाही, असा दावा जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्‍त केला. 

महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर प्रभाग क्र. 2, 3, 4 आणि 5 मधील भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ सुभाष चौकात रात्री एकत्रित घेण्यात आलेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. खासदार ए. टी. पाटील, आमदार सुरेश भोळे, स्मिता वाघ, उन्मेष पाटील, चंदुलाल पटेल, माजी आमदार डॉ. गुरुमुख जगवानी, माजी महापौर ललित कोल्हे, ज्येष्ठ नेते गजानन जोशी आदी उपस्थित होते. 
मंत्री महाजन म्हणाले, की अनेक वर्षांपासून महापालिकेवर खानदेश विकास आघाडीची सत्ता आहे. परंतु महापालिकेतील मूलभूत समस्या व पायाभूत सुविधांचे प्रश्‍न कायम राहिले. आज व्यापारी, फेरीवाल्यांसह जळगावकर नागरिक त्रस्त आहेत. या प्रश्‍नांसाठी आंदोलने झाली; पण एकही प्रश्‍न सुटला नाही. एकहाती सत्ता दिल्यानंतरही विकास कुठे गेला? रस्ते, समांतर रस्त्यांचा प्रश्‍न मिटलेला नाही. देशात कुठे नसेल ते विमानतळ बांधण्याचे काम महापालिकेने केले. विमानतळ, हुडकोसाठी कर्ज काढल्याने महापालिका कर्जाच्या बोजाखाली आहे. केंद्र व राज्य शासनाकडून येणारा संपूर्ण निधी कर्ज फेडण्यातच जात आहे. हे सर्व प्रश्‍न सुटायला हवेत. यामुळे भाजपला एकदा महापालिकेत बहुमत द्या अन्‌ महापौरही बसवा. एका वर्षात जळगावचा विकास केल्याशिवाय राहणार नाही. मात्र, जर पुन्हा तुम्ही शिवसेनेच्या हाती सत्ता दिली, तर पाच वर्षे जळगावला पुन्हा मागे नेल्याशिवाय ते राहणार नाहीत. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon bjp jahir sabha girish mahajan