भाजपचे मंत्री आज प्रचारांच्या मैदानात 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 15 जुलै 2018

जळगाव : महापालिका निवडणुकीच्या मैदानातील चित्र मंगळवारी (ता. 17) स्पष्ट होणार आहे. परंतु, प्रचारास वेळ कमी असल्याने उमेदवारांनी जनतेच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत. पक्षीय पातळीवरही आता प्रचार सुरू होणार असून, भाजपतर्फे राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील व जलसंपदामंत्री गिरीश महाजन, पक्षाचे नेते एकनाथ खडसे हे उमेदवारांच्या प्रचारास प्रारंभ करणार आहेत. 

चंद्रकांत पाटील व मंत्री महाजन हे उद्या (ता. 15) जळगाव दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या उपस्थितीत महापालिका उमेदवारांच्या प्रचारास प्रारंभ होणार आहे. जुन्या गावातील श्रीराम मंदिरात महसूलमंत्री पाटील, मंत्री महाजन, श्री. खडसे यांच्या हस्ते श्रीफळ फोडून प्रचारास सुरवात होणार आहे. सकाळी दहाला हा कार्यक्रम होणार असून, सर्व 19 प्रभागांतील प्रचार सुरू करण्यात येणार आहे. यावेळी विभागीय संघटनमंत्री किशोर काळकर, महापौर ललित कोल्हे, खासदार ए. टी. पाटील, खासदार रक्षा खडसे, आमदार सुरेश भोळे, आमदार स्मिता वाघ, आमदार चंदू पटेल, माजी आमदार गुरुमुख जगवानी, मनपा विरोधी पक्षनेते वामनराव खडके, महापालिकेतील गटनेते सुनील माळी उपस्थित राहणार आहेत. 
श्रीराम मंदिरात शुभारंभ झाल्यानंतर दिवसभर शहरातील विविध मंदिरांत पूजन करून प्रचाराचा नारळ वाढविण्यात येईल. नियोजनानुसार सकाळी अकराला पत्र्या हनुमान मंदिर, दुपारी बाराला हनुमान मंदिर (जिल्हा बॅंकेजवळ), दुपारी एकला ओंकारेश्वर मंदिर, दुपारी दोनला झुलेलाल मंदिर, दुपारी तीनला साईबाबा मंदिर (मेहरूण), संतोषी माता मंदिर, दुपारी चारला भवानी मंदिर (पिंप्राळा), दुपारी 4.15 वाजता हनुमान मंदिर (पिंप्राळा), दुपारी साडेचारला गणपती मंदिर (खोटेनगर), सायंकाळी पाचला सर्व उमेदवार व पदाधिकारी, समित्यांची संयुक्त बैठक ब्राम्हण सभेत होईल.

Web Title: marathi news jalgaon bjp minister election prachar