पैशांच्या बळावर भाजप सत्तेत : आमदार डॉ. पाटील 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 जुलै 2018

जळगाव ः गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत मोदी सरकार आल्यापासून पैशांच्या जोरावर निवडणूका लढल्या जात आहेत. भाजप वाल्यांचा स्वतःवर, कार्यकर्त्यावर विश्‍वास नाही. यामुळे ते पैसे लावून निवडणूकीतून सत्तेत येत आहे. यामुळेच राष्ट्रवादीचे उमेदवार पळविले जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष, आमदार डॉ. सतीष पाटील यांनी केला. 

ते म्हणाले, की जे राष्ट्रवादीतून दुसऱ्या पक्षात गेले त्याने काही परिणाम होणार नाही. ते विकावू आहेत. त्यांची काय ती किंमत. जे आहे ते लढायला तयार आहेत. आमचे नेते, पदाधिकारी एकनिष्ठ जावून महापालिका निवडणुकीत जिंकू. समविचारी पक्षांना सोबत घेवू. प्रत्येक प्रभागाची जबाबदारी प्रत्येकला वाटून देवू. त्यांनी माघारीनंतर त्याच वॉर्डावर लक्ष केंद्रीत करून आपले उमेदवार कसे निवडून येतील याकडे लक्ष द्यावयाचे आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार तीन दिवस जळगावमध्ये असतील. खासदार सुप्रिया सुळेंसह अनेक नेत्यांच्या सभा होतील. 
 
खडसेंना रोखण्यासाठी... 
मुक्ताईनगर मध्ये नगरपंचायतीच्या निवडणुकीत आमदार एकनाथराव खडसेंचा प्रभाव कमी होण्यासाठी शिवसेनेला बळ दिले जाते. मात्र जळगावमध्ये महापालिका निवडणुकीत भाजप शिवसेनेला युतीसाठी आग्रह करते असा खेळ भाजप करतेय,असा आरोपही श्री.पाटील यांनी केला. 

Web Title: marathi news jalgaon bjp satish patil