स्थानिक संस्थांमध्येही आता भाजप-सेना युती : गिरीश महाजन

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 2 एप्रिल 2019

जळगाव : लोकसभा निवडणुकीसाठी युती झाल्यानंतर आता राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही भाजप-शिवसेना एकत्रित येऊन कारभार पाहणार आहेत. ज्याठिकाणी भाजपने अन्य पक्षांची मदत घेऊन सत्ता मिळवली असेल, तिथे सेनेला सोबत घेतले जाईल. राज्यभरात हा फॉर्म्युला असेल, अशी भूमिका जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी मांडली. 

जळगावात जी.एम. फाउंडेशनच्या कार्यालयात प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी चर्चा करताना ते बोलत होते. शिवसेनेने भाजपला मदत न करण्याचा पवित्रा घेतला असून त्याबाबत विचारले असता महाजन म्हणाले, आता लोकसभेसाठी युती झाली आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना युतीधर्म पाळावाच लागेल. याआधी अनेक ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये दोन्ही पक्ष स्वतंत्र लढलेत. परंतु, आता यापुढे ज्या-ज्या ठिकाणी गरज आहे, त्या प्रत्येक ठिकाणी राज्यभरात युतीचा "फॉर्म्युला' राबविला जाईल. अगदी नगरमध्येही आम्ही राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापन केली असली तरी त्याठिकाणी आता सेनेसोबत युती करु, असे महाजन यांनी स्पष्ट केले. 

पाटील, चौधरींची समजूत काढू 
तिकीट नाकारलेले खासदार ए.टी. पाटील अद्यापही प्रचारात सक्रिय नाहीत, याबद्दल छेडले असता ते म्हणाले, उमेदवारी न मिळाल्याने ते नाराज आहेत. मलाही अद्याप भेटलेले नाहीत. त्यांना उमेदवारी करायची असेल तर ते करु शकतात. मात्र, त्यांची समजूत काढू. अमळनेरचे सहयोगी आमदार शिरीष चौधरीही उमेदवारीबाबत बोलत असून त्यांच्याशी चर्चा केली असून ती सकारात्मक आहे, ते उमेदवारी मागे घेतील, असा विश्‍वास महाजन यांनी व्यक्त केला.

Web Title: marathi news jalgaon bjp shena yuti mahajan