सिध्दुच्या पुतळ्याला भाजप युवा मोर्चोतर्फे जोडेमारो 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 ऑगस्ट 2018

जळगाव : पंजाब सरकारमधील कॉंग्रेसचे मंत्री नवज्योतसिंग सिध्दू यांनी पाकिस्तानात जावून तेथील लष्करप्रमुखांची गळाभेट घेतल्याचा भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाने निषेध केला आहे. त्यांच्या पुतळ्याला जोडो मारो आंदोलन करण्यात आले. 

आज दुपारी टॉवर चौकात भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष व नगरसेवक जितेंद्र मराठे व प्रदेश सरचिटणीस गितांजली मराठे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. भारत-पाक वादामुळे गेल्या दोन वर्षापासून दोन्ही देशात कोणतीही चर्चा होत नाही. दहशतवाद थांबवा मग चर्चा करू असे असतांनाही सिध्दू यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इमरानखान यांच्या शपथविधी सोहळ्यास उपस्थिती दिली. यावेळी त्यांनी पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांचीही गळाभेट घेतली. त्यांनी भारतातील 125 कोटी लोकांचा अपमान तर आहेच परंतु देशाच्या संरक्षणासाठी आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या भारतीय सैनिकांचाही अपमान आहे. त्यांचा निषेध म्हणून सिध्दू यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारो आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हा सरचिटणीस भूपेश कुळकर्णी, आनंद सपकाळे, जितेद्र चौथे, विक्की सोनार, मंगेश जोहरे, योगेश बागडे, आदी उपस्थित होते
 
Web Title: marathi news jalgaon bjp yuva sidhu jodomaro