मुख्यमंत्र्यांना काळे झेंडू दाखवून निदर्शने 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 19 एप्रिल 2019

अमळनेर ः पाडळसे धरण जनआंदोलन समितीने आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना रस्त्यावर काळे झेंडे दाखवून निदर्शने केली.'पाडळसे धरण झालेच पाहिजे' असा नारा त्यांनी लगावला. मुख्यमंत्र्यांच्या वाहनांच्या ताफ्यासमोर रस्त्यावर येऊन अचानक त्यांनी निदर्शने केल्याने पोलिसांची तारांबळ उडाली. 

अमळनेर ः पाडळसे धरण जनआंदोलन समितीने आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना रस्त्यावर काळे झेंडे दाखवून निदर्शने केली.'पाडळसे धरण झालेच पाहिजे' असा नारा त्यांनी लगावला. मुख्यमंत्र्यांच्या वाहनांच्या ताफ्यासमोर रस्त्यावर येऊन अचानक त्यांनी निदर्शने केल्याने पोलिसांची तारांबळ उडाली. 
पाडळसरे धरणाचे काम गेल्या २० वर्षांपासून रखडलेले आहे. सत्तेत येण्यापूर्वी धरणपूर्तीचे आश्वासन देणाऱ्या सरकारने साडेचार वर्षात धरणास निधी उपलब्ध करून दिला नाही.जिल्ह्यातील असूनही जलसंपदा मंत्री यांनी धरणाकडे,आणि धरणाचं प्रदीर्घ काळ चाललेल्या आंदोलनाकडे उपोषण, जेलभरो,जलसत्याग्रहाकडे दुर्लक्ष केल्याने जनतेच्या भावना संतप्त आहे.मुख्यमंत्री यांना भेटून अमळनेरसह ६ तालुक्यातील जनतेच्या धरणाचे निवेदन जनआंदोलन समिती देणार होती. मात्र पोलिस प्रशासनाने एक दिवस आधीच समितीला कोणतेही आंदोलन,निवेदन देणेचे प्रयत्न करू नये,आंदोलन टोपी घालू नये! असे सांगितले होते. त्यामुळे मुख्यमंत्री यांच्यापर्यत धरणाचे प्रश्नाचे गांभीर्य लक्षात आणून देणेसाठी जनआंदोलन समितीचे कार्यकर्ते प्रा.शिवाजीराव पाटील, रणजित शिंदे,महेश पाटील,देविदास देसले,नामदेव पाटिल,सतिष काटे यांच्यासह अनेक कार्यकर्ते प्रतापमिल मधिल रस्त्यावर एक एक करून रस्त्याच्या बाजूला आले. मुख्यमंत्र्यांना धरणाचे फलक व काळे झेंडे दाखवत अचानकपणे मुख्यमंत्री यांच्या ताफ्यासमोर प्रकट झाले.'पाडळसरे धरण झालेच पाहिजे!","धरण आमच्या हक्काचं"या घोषणांनी परिसर दणाणून सोडला.अचानक झालेल्या आंदोलन कर्त्यांचा या निदर्शनानी सतर्क असलेले पोलिसानी आंदोलकांना रस्त्याच्या बाजूला रेटण्याचा जोरदार प्रयत्न केला.तर आंदोलकानी धरणाची मागणी यावेळी जोरदारपणे लावून धरली. पाडळसरे धरण तातडीने पूर्ण आमच्या परिसरासाठी अत्यावश्यक आहे या प्रश्नाकडे मुख्यमंत्री यांनी लक्ष द्यावे या उद्देशानेच आम्ही आंदोलन केले असे यावेळी संघर्ष समिती चे प्रा.शिवाजीराव पाटील यांनी सांगितले. तर "हि निवडणूक धरणाची व रस्त्यांची नाही असे महायुतीच्या मागील मेळाव्यात जलसंपदा मंत्री यांनी सांगितल्याने समितीचा भ्रमनिरास झाला! असे समिती रणजित शिंदे यांनी सांगितले. आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी कडे करून रोखुन धरले तात्काळ प्रतिबंधात्मक अटक करून पोलीस गाडीत टाकत सभास्थळा मार्गाहून घेऊन गेले. तर पाडळसरे धरण संघर्ष समितीचे सुभाष चौधरी यांचेसह अजयसिंग पाटील, रविंद्र पाटील, सुनिल पाटील, सतिष पाटील,सतिष पाटिल,रामराव पवार,सुपडू बैसाणे,डी.एम.पाटिल,आर.बी.पाटिल आदीना निदर्शनात्मक हालचाल करण्यापूर्वीच पोलिसांनी मुख्यमंत्री यांचा ताफा निघत असताना जागेवरच रोखून धरले होते.

Web Title: marathi news jalgaon black zenda padarsare samiti nidarshane cm