बीटी बियाण्यांना यंदा कमी प्रतिसाद 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 10 जून 2018

जळगाव ः जिल्ह्यात शेतकऱ्यांनी बी.टी. कापूस बियाण्यांची हवी तशी खरेदी न केल्याने विक्रेत्यांमध्ये बी.टी.ची पाकिटे विकली जातील किंवा नाही याबाबत शंका व्यक्त होत आहे. गतवर्षी पडलेली बोंडअळी व कपाशीला मिळालेला अल्प भाव यामुळे शेतकरी बी.टी. कपाशीऐवजी दुसरेच वाण घेऊन पेरणी करतील काय? अशी शंका निर्माण झाली आहे. आतापर्यंत सुमारे बारा लाख पाकिटांची विक्री झाली आहे. या महिन्यात तेवीस लाख पाकिटे उपलब्ध होणार असून, यातील सर्वच पाकिटांची विक्री होणार नसल्याचे सध्या चित्र आहे. 

यंदा कपाशी लागवड कमी होईल, असे चित्र आहे. गतवर्षी कापसाला ऐन गरजेवेळी हवा तसा भाव नव्हता. आता कुणाच्याही घरात कापूस नाही आणि भाववाढ झाली आहे. ही भाववाढ फक्त जिनर्स व निर्यातदारांना फायद्याची असल्याचा मुद्दाही ऐरणीवर आला आहे. शिवाय गुलाबी बोंडअळी येईल की नाही, आली तर नुकसान होईल, असा संभ्रमही आहे. यामुळे गिरणा व तापीकाठावरील गावांमध्ये यंदा पूर्वहंगामी कपाशी लागवड कमी झाली आहे. 
रावेर, यावल व चोपडा या तालुक्‍यांत अधिकची पूर्वहंगामी कपाशीची लागवड होते. परंतु याच तालुक्‍यांमध्ये यंदा लागवड कमी आहे. यावल व रावेरला केळी उत्पादक देशी सुधारित व देशी संकरित कापूस बियाण्यांची लागवड करीत आहेत. चोपडा, जळगाव, पाचोरा व मुक्ताईनगरातही हवी तशी कपाशी लागवड झालेली नाही. कोरडवाहू कापूस उत्पादक अद्याप मशागत व इतर तयारी करीत आहेत. पुरेसा पैसा हाती नसल्याने कपाशी बियाणे शेतकरी खरेदी करीत नसल्याची स्थिती आहे. हवा तसा प्रतिसाद बी.टी. कापूस बियाण्याच्या विक्रीबाबत नसल्याने काही कंपन्यांनी आपले बागायती कपाशी बियाणे परत मागवून इतरत्र पाठविण्याची तयारी केल्याचे चित्र आहे. 
जिल्ह्यात जूनच्या मध्यापर्यंत दरवर्षी सुमारे 15 ते 16 लाख बी.टी. कपाशी बियाण्याच्या पाकिटांची विक्री व्हायची. परंतु यंदा तितकासा प्रतिसाद नाही. त्यामुळे सुमारे चार लाख पाकिटांची कमी विक्री झाली आहे, अशी माहिती बियाणे विक्रेत्यांनी दिली. 

चाळीस हजार हेक्‍टरवर लागवड 
जिल्ह्यात आतापर्यंत सुमारे 40 हजार हेक्‍टरवर पूर्वहंगामी कपाशीची लागवड झाली आहे. कोरडवाहू कपाशीची लागवड कुठेही झालेली नाही. आणखी एक चांगला पाऊस पडल्यानंतरच पेरणी सुरू होईल. परंतु कपाशी लागवड मागील हंगामाच्या तुलनेत सुमारे 20 ते 22 हजार हेक्‍टरने कमी होईल, असे जाणकार सांगतात. 

आमच्या भागात देशी सुधारित कापूस बियाण्यांची लागवड अनेक ठिकाणी झाली आहे. बी.टी. कपाशी लागवड कमी आहे. अनेक शेतकऱ्यांनी यंदा कपाशी लागवड टाळली आहे. 
- किशोर पाटील, शेतकरी 

Web Title: marathi news jalgaon bt cotton seeds