जळगाव- पुणे प्रवास 78 रुपयांनी महागला; "शिवशाही' आवाक्‍याबाहेर 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 16 जून 2018

जळगाव ः डिझेल दरवाढीनंतर आर्थिक स्थिती बिकट झालेल्या एसटी महामंडळाने भाडेवाढ करण्याचा अखेर निर्णय घेतला. आज मध्यरात्रीपासून भाडेवाढ अमलात आली असून, एसटीची भाडेवाढ प्रवाशांच्या पथ्यावर पडणार आहे. भाडीवाढीनंतर जळगाव- पुणे मार्गावरील एसटीचा प्रवास तब्बल 78 रुपयांनी महागला आहे. 

जळगाव ः डिझेल दरवाढीनंतर आर्थिक स्थिती बिकट झालेल्या एसटी महामंडळाने भाडेवाढ करण्याचा अखेर निर्णय घेतला. आज मध्यरात्रीपासून भाडेवाढ अमलात आली असून, एसटीची भाडेवाढ प्रवाशांच्या पथ्यावर पडणार आहे. भाडीवाढीनंतर जळगाव- पुणे मार्गावरील एसटीचा प्रवास तब्बल 78 रुपयांनी महागला आहे. 
राज्य परिवहन महामंडळाच्या प्रवास भाड्यात वाढ करण्याचा निर्णय घेतल्यानंतर भाडेवाढीस मंजुरी दिली. राज्यात एसटीचा प्रवास आज (15 जून) मध्यरात्रीपासून 18 टक्‍क्‍यांनी महागला. कर्मचारी वेतनवाढ आणि डिझेलच्या दरात वाढ तसेच देखभाल दुरुस्तीत वाढीमुळे एसटी महामंडळाने भाडेवाढ लागू करण्याचा निर्णय घेतला होता. इंधन दरवाढीमुळे महामंडळावर बोजा वाढल्याचा भार आता प्रवाशांच्या खिशाला बसणार आहे. वाढता तोटा भरून काढण्यासाठी महामंडळाने प्रतिटप्पा भाडेवाढ लागू करताना प्रतिटप्पा 3 रुपये 70 पैसे याप्रमाणे भाडेवाढ झाली आहे. या भाडेवाढीमुळे जळगाव- पुणे प्रवास भाडे 422 रुपयांवरून 500 रुपये, तर जळगाव- मुंबईचे (रातराणी) भाडे 544 रुपयांवरून 650 रुपये इतके भाडे झाले आहे. 
 
शिवशाही आवाक्‍याबाहेर 
आरामदायी प्रवास करण्याच्या दृष्टीने महामंडळाने शिवशाही बससेवा सुरू केली. यात वातानुकूलित आणि स्लिपर अशा दोन प्रकारच्या शिवशाही बस राज्यातील विविध मार्गावर सुरू झाल्या. महामंडळाच्या 18 टक्‍के प्रवास भाडेवाढीनंतर शिवशाहीचा प्रवास सामान्यांच्या आवाक्‍याबाहेर गेला आहे. कारण, वातानुकूलित शिवशाही आणि स्लिपर कोच शिवशाही बसच्या भाड्यात मोठ्या फरकाने वाढ झाली आहे. जळगाव- पुणे शिवशाही बसचे भाडे 629 रुपये होते. याठिकाणी प्रवाशांना आता 740 रुपये व स्लिपर शिवशाहीसाठी 1 हजार 70 रुपये मोजावे लागणार आहेत. 
 
"शिवशाही' भाडेवाढ (कंसात जुने भाडे) 
जळगाव- पुणे..............740 (629) 
जळगाव- नाशिक...........475 (404) 
जळगाव- मुंबई.............820 (720) 
जळगाव- औरंगाबाद..........310 (264) 
जळगाव- धुळे.................180 (161) 
जळगाव- नगर................. 520 (442) 
जळगाव- सिल्लोड..........190 (160) 

Web Title: marathi news jalgaon bus bhadevath