महिलेची सुटकेस अलगद उघडून चोरट्यांचा डल्ला 

bag robary
bag robary

जळगाव : शहरातील ईश्‍वर कॉलनी परिसरातील रहिवासी 63 वर्षीय महिला 14 जानेवारीला बऱ्हाणपूर येथे नातेवाइकांना भेटण्यासाठी गेल्या होत्या. बसस्थानक ते गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयादरम्यान दोन भामट्यांनी बॅग अलगद उघडून त्यातील 4 लाख 91 हजारांचा ऐवज लंपास केला आहे. बऱ्हाणपूर येथून परतल्यावर या महिलेने दिलेल्या तक्रारीवरून जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल होऊन तो एमआयडीसी पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. 
तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे, ईश्‍वर कॉलनी भागातील सेंट लॉरेन्स शाळेजवळ मनीबाई मोतीराम व्यास (वय 63) या कुटुंबीयांसह वास्तव्यास आहेत. बसस्थानकाशेजारील श्रीराम मेडिकल स्टोअर्सच्या संचालकांनी 14 जानेवारीला सकाळी साडेनऊच्या सुमारास बसस्थानकामध्ये आई मनीबाईला बऱ्हाणपूर बसमध्ये बसविले. बस सुटल्यानंतर महामार्गावर गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाजवळ असताना मनीबाई बसलेल्या ठिकाणी वर ठेवलेली सुटकेस खाली पडली. खाली पडलेली सुटकेस मागच्या सीटवर बसलेल्या दोघा तरुणांनी उचलली व आजी तुमची सुटकेस सुरक्षित आहे. वर ठेवून दिली, असे सांगत अलगद सुटकेस उघडून त्यातील 46 हजार रुपये रोख, 3 लाख 20 हजारांचा चपलाहार, 80 हजारांचे मंगळसूत्र (40ग्रॅम), 45 हजारांचे (30ग्रॅम) बाजूबंद असा एकूण 4 लाख 91 हजार रुपयांचा ऐवज सुटकेस उचलणाऱ्या दोघा तरुणांनी लांबवल्याप्रकरणी जिल्हापेठ पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. 

हद्दीचा वाद...कागद इकडून तिकडे! 
व्यास यांनी तक्रारीत नमूद केल्यानुसार, सुटकेस गोदावरी अभियांत्रिजवळ बसमध्ये खाली पडली होती. त्यामुळे ठाणे अंमलदाराने तक्रार नोंदवून घेतल्यानंतर घटनास्थळ एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत असल्याने तक्रारीचे दस्तऐवज सर्व एमआयडीसी पोलिसांत रवाना केले. त्त्÷ितेथे पोचल्यावर गुन्ह्याची सुरवात बसस्थानकापासून झाली असून, तक्रारदार एक आठवड्यानंतर तक्रार देण्यास आल्याने घटनास्थळ बसस्थानक असल्याने गुन्हा जिल्हापेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील असल्याने येथील ठाणे अंमलदाराने कागदपत्रे पुन्हा आल्या पावली जिल्हापेठला परत पाठवली. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com