खांब, जलवाहिन्या स्थलांतरासाठी 5 कोटी निधीची शासनाकडे मागणी : जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 8 ऑगस्ट 2019

जळगाव ः येथील शिवाजीनगर उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. मात्र, त्या कामाच्या मार्गात येणारे विजेचे खांब, जलवाहिन्यांचे स्थलांतर करण्यासाठी महापालिकेने निधी खर्च करावयाचा असतो. महापालिकेची आर्थिक स्थिती बिकट असल्याने या कामांसाठी पाच कोटींचा निधी मिळावा, अशी शिफारस राज्य शासनाकडे केली असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी दिली. 

शिवाजीनगरचा उड्डाणपूल पाडून त्याठिकाणी नवीन उड्डाणपुलाचे काम गेल्या तीन महिन्यांपासून रेल्वेतर्फे सुरू आहे. या कामादरम्यान येणारे विजेचे अनेक खांब आहे. नागरिकांना पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्याही आहेत. त्यांचे स्थलांतर इतर ठिकाणी करण्यासाठी पाच कोटींची गरज आहे. मात्र, महापालिकेची स्थिती बिकट असल्याने महापालिका तो खर्च पेलू शकत नाही. यामुळे महापालिकेने जिल्हा प्रशासनाकडे या कामांसाठी निधीची मागणी केली होती. जिल्हा नियोजन समितीतून एवढा निधी देता येत नाही. यामुळे तो निधी शासनाकडून मिळण्यासाठी शासनाला पत्र पाठविले असल्याचे सांगण्यात आले. 

स्थलांतराची अन्य कामेही रखडली 
जळगाव शहरातून जाणाऱ्या महामार्गाचे चौपदरीकरण करण्यात येत आहे. मात्र, या मार्गावरील विजेचे खांब स्थलांतरित करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीतून निधी मिळावा, अशी मागणी वीज कंपनीने केली होती. विजेचे खांब स्थलांतराचे कामही गेल्या महिन्यापासून रखडले आहे. वीज कंपनी विजेचा पुरवठा करून बिलाची आकारणी करते. त्यांचेच विजेचे खांब आहे. ते वीज कंपनीनेच स्थलांतर करायला हवेत. त्याला जिल्हा नियोजन समितीतून निधी देता येणार नसल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon callecter 5 carrore nidhi demand