कान्हदेश मंच'ने सावरली दानिशच्या करिअरची घडी 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 एप्रिल 2018

जळगाव : विज्ञान-तंत्रज्ञानाचा जनतेच्या कल्याणासाठी, विधायक वापर केला तर ते खऱ्या अर्थाने मानवजातीसाठी देणगी ठरते. त्याचा प्रत्यय विविध उदाहरणांवरून येतो. एरवी सोशल मीडियाच्या अतिरेकी वापरावर टीका होत असताना एका तरुणाच्या करिअरची विस्कटलेली घडी व्हॉटस्‌ऍप ग्रुपने सावरल्याचे अनोखे उदाहरण समोर आले आहे. 

जळगाव : विज्ञान-तंत्रज्ञानाचा जनतेच्या कल्याणासाठी, विधायक वापर केला तर ते खऱ्या अर्थाने मानवजातीसाठी देणगी ठरते. त्याचा प्रत्यय विविध उदाहरणांवरून येतो. एरवी सोशल मीडियाच्या अतिरेकी वापरावर टीका होत असताना एका तरुणाच्या करिअरची विस्कटलेली घडी व्हॉटस्‌ऍप ग्रुपने सावरल्याचे अनोखे उदाहरण समोर आले आहे. 

सुप्रिम कॉलनीतील दानिश सलाम देशमुख हा केसीई सोसायटीच्या "अब्दुल कलाम स्किल डेव्हलपमेंट सेंटर'मध्ये "बांधकाम निरीक्षक' हा पदविका अभ्यासक्रम पूर्ण करीत आहे. पालकांनी रुपया-रुपया जोडून शैक्षणिक शुल्क भरायला 3 हजार रुपये जमा केले होते. ती रक्कम चोरटे घेऊन गेले. दानिशची ही आपत्ती वृत्तपत्रातून प्रसिद्ध झाली. जळगावातील "कान्हदेश मंच' या ग्रुपवर दानिशचा विषय चर्चेला आला. त्यातूनच या विषयाला चालना मिळाली. आणि युवाशक्ती फाउंडेशनचे विराज कावडीया, अमित जगताप व तेजस श्रीश्रीमाळ यांनी सुप्रिम कॉलनीत जाऊन दानिशची माहिती घेतली. त्याला घेऊन विराज आशा फाउंडेशनचे प्रकल्प संचालक गिरीश कुळकर्णी यांच्याकडे गेला. नंतर "कान्हदेश मंच' या ग्रुपच्या माध्यमातून दानिशच्या मदतीसाठी दानशूर मंडळींचे सकारात्मक निरोप सुरू झाले होते. 

गार्डियन द फाउंडेशन'चा पुढाकार 
दरम्यान, दानिशच्या शिक्षणाच्या संपूर्ण खर्चाची जबाबदारी "गार्डियन द फाउंडेशन' या संस्थेने उचलण्याची तयारी दर्शवली. प्रत्यक्षात अशा प्रकारे मदतीसाठी इतर संस्था व व्यक्तीही तयार होत्या. "गार्डियन'चे सदस्य रमेशकुमार मुणोत हे ग्रुपमध्ये सदस्य आहेत. त्यांनी फाउंडेशनचे पदाधिकारी ऍड. के.बी. वर्मा यांच्याशी चर्चा करुन दानिशच्या शैक्षणिक व इतर गरजांची जबाबदारी स्वीकारली. त्याचे दोन्ही वर्षांचे शैक्षणिक शुल्क भरून त्याला दत्तक घेण्याचे त्यांनी ठरविले आहे. 

जैन समूहा'त नोकरी 
दानिशची आपत्ती अशी सावरत असताना आणखी एक आनंदाची बातमी चालून आली. दानिशने त्याचा दोन वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण केला तर त्याला जैन उद्योग समूहाच्या बांधकाम प्रकल्पावर नोकरी देण्याचे समूहातर्फे अध्यक्ष अशोक जैन यांनी आश्‍वस्त केले आहे.

Web Title: marathi news jalgaon carreir