गुन्हेगारीवर वचक ठेवणार हजार "सीसीटीव्ही' कॅमेरे 

गुन्हेगारीवर वचक ठेवणार हजार "सीसीटीव्ही' कॅमेरे 

जळगाव ः भुसावळ विभागातील आठ रेल्वेस्थानकांवर एक हजार अद्ययावत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येत आहे. त्यापैकी भुसावळ रेल्वेस्थानकावर 110 सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. जळगाव स्थानकावरही सत्तर कॅमेरे बसविले आहेत. यामुळे रेल्वेत शिरताना प्रवाशांच्या खिशातून पाकीट, पर्सची चोरी होणे, मोबाईल हिसकावणे आदी गुन्ह्यांना आळा बसण्यास मदत झाली आहे. 
भुसावळ रेल्वे विभागात हजारो प्रवासी रोज ये-जा करतात. प्रवासी रांगेत उभे असताना त्याच्या पाकिटांची चोरी, मोबाईल हिसकावणे, महिलांच्या गळ्यातील चैन लांबविणे, पर्स चोरी, सामानाची चोरी आदी घटना नित्याच्या घटना आहेत. केव्हा प्रवाशांमध्ये तिकीट काढण्यावरून वादाचे प्रसंग उद्‌भवतात. विशेषतः आरक्षण करताना, साधे तिकीट काढताना हे प्रसंग घडतात. रेल्वे परिसरात आरपीएफ जवानांचे नियंत्रण असते. या सर्व घटनांची क्षणचित्रे एकाच ठिकाणी नियंत्रण करणाऱ्या अधिकाऱ्यांना दिसावीत व त्याने लगेच संबंधितांना घटना स्थळी जाऊन घटनेवर नियंत्रण मिळवावे, या उद्देशाने हे कॅमेरे लावले आहेत. भुसावळ "जंक्‍शन' असल्याने तेथे अधिक कॅमेरे लावले आहेत. सहा फलाटावर प्रवासी रेल्वे येतात. ते बाहेर पडताना त्यांच्यासोबत काही प्रकार घडू नये, यासाठी मोक्‍याच्या ठिकाणी कॅमेरे लावले आहेत. चाळीसगाव, पाचोरा, रावेर, बऱ्हाणपूर, बोदवड, मूर्तिजापूर, शेगाव आदी स्थानकावर हे कॅमेरे लावण्यात येत आहेत. 
 
"वायफाय' सुविधा 
भुसावळ विभागातील भुसावळ, जळगाव, नाशिकरोड यासह "अ' दर्जा असलेल्या रेल्वेस्थानकांवर "वायफाय' सुविधा देण्यात आली आहे. सोबतच प्रवाशांच्या प्रतीक्षा कक्षात लॅपटॉप, मोबाईल चार्जिंगची व्यवस्था करण्यात आली आहे. 
 
रेल्वेस्थानकावरील गुन्हेगारीला आळा बसावा, सुरक्षिततेसाठी महत्त्वाच्या रेल्वेस्थानकावर "सीसीटीव्ही' कॅमेरे लावण्यात येत आहे. भुसावळ, जळगाव, नाशिक रोड स्थानकांवर कॅमेरे लावण्याचे कामे पूर्ण होऊन कार्यान्वित करण्यात आले आहेत. यामुळे चोऱ्यांचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल. 
- आर. के. यादव, डीआरएम, भुसावळ. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com