गिरणा धरण झाले 31 टक्के 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 18 ऑगस्ट 2018

चाळीसगाव : हरणबारी धरणापाठोपाठ गुरुवारी (16 ऑगस्ट) केळझर धरण "ओव्हर फ्लो' झाले. चणकापूर धरण क्षेत्रात झालेल्या पावसामुळे त्यातूनही मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरू आहे. त्यामुळे गिरणा धरणाच्या पाणीसाठ्यात चांगली वाढ अपेक्षित आहे. धरणात सध्या 31 टक्के पाणीसाठा झाला आहे, अशी माहिती उपअभियंता धर्मेंद्रकुमार बेहरे यांनी "सकाळ'ला दिली. 

राज्यात पाऊस पुन्हा सक्रिय झाला असून गिरणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही चांगला पाऊस होत आहे. त्याची फलश्रुती म्हणून गुरुवारी (16 ऑगस्ट) केळझर धरण ओसंडून वाहत आहे. सद्यःस्थितीत त्यातून 1 हजार 100 क्‍यूसेक विसर्ग सुरू आहे. आठवड्यापूर्वी हरणबारी धरण "ओव्हर फ्लो' झाले होते. त्यातूनही सध्या 3 हजार 689 क्‍यूसेक विसर्ग सुरू आहे. चणकापूर धरण क्षेत्रातही चांगला पाऊस झाला असून त्यातून 7 हजार 498 क्‍यूसेक विसर्ग सध्या सुरू आहे. या तीनही धरणांमधून सुमारे बारा हजार क्‍यूसेक पाणी गिरणात येत आहे. त्यामुळे गिरणाच्या साठ्यात उद्या (18 ऑगस्ट) दिवसभरात चांगली वाढ अपेक्षित आहे. सध्या गिरणा धरणात 5 हजार 685 दशलक्ष घनफूट जिवंत साठा शिल्लक आहे. 

मन्याड धरणात मृतसाठा 
चाळीसगाव तालुक्‍यातील सर्वांत मोठे धरण असलेल्या "मन्याड'मध्ये मृतसाठा शिल्लक आहे, अशी माहिती सहायक अभियंता हेमंत पाटील यांनी "सकाळ'ला दिली. मन्याड धरणावरील माणिकपुंज धरणातही मृतसाठाच शिल्लक आहे. मन्याड भरण्याच्या दृष्टीने माणिकपुंज धरणे भरणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे त्या भागात जोरदार पावसाची प्रतीक्षा होत आहे. 

तालुक्‍यातील प्रकल्पांमध्ये ठणठणाट ! 
तालुक्‍यात सर्वत्र चांगला पाऊस झाला असला तरी पिंप्री उंबरहोळ, ब्राह्मणशेवगे, पिंपरखेड, बोरखेडा, वलठाण, राजदेहरे, देवळी- भोरस, पथराड, हातगाव-1, कुंझर-2 या प्रकल्पांमध्ये ठणठणाट आहे. केवळ खडकीसीम (9.13 टक्के), वाघळी- 1 (19 टक्के), वाघळी- 2 (24.97) व कृष्णापुरी (1.38 टक्के) असा साठा सद्यःस्थितीत आहे.

Web Title: marathi news jalgaon chalisgaon girna river 31 parsent