चाराटंचाईच्या दृष्टीने 67 हजार किलो बियाणे वाटप 

चाराटंचाईच्या दृष्टीने 67 हजार किलो बियाणे वाटप 

जळगाव ः जिल्ह्यात चाराटंचाईचा प्रश्‍न सध्या तरी उद्‌भवलेला नसून, संभाव्य चाराटंचाईला तोंड देण्यासाठी जिल्ह्यात चारा बियाण्यांचे वाटप करण्यात आले आहे. यात दोन हजार हेक्‍टर जमिनीवर चारा लागवडीचे उद्दिष्ट हाती घेण्यात आले असून, याअंतर्गत आतापर्यंत सुमारे 67 हजार 366 किलो बियाणे वाटप केले असून, यातून 82 हजार टन चारा उत्पादन होणे अपेक्षित आहे. 
जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागामार्फत चाराटंचाई टाळण्यासाठीच्या उपाययोजना राबविण्यात येत आहेत. राष्ट्रीय कृषी योजनेत बियाण्यांचे वाटप नोव्हेंबरपासून सुरू करण्यात आले. आतापर्यंत हे वाटप जवळपास पूर्ण झाले असून, दोन ते तीन महिन्यांत चारा उपलब्ध होऊ शकेल. पाण्याचा स्त्रोत असलेल्या शेतकऱ्यांनाच बियाणे वाटप करण्यात आले आहे. शिवाय आता गाळपेरा क्षेत्रासाठी बियाण्यांचे वाटप आता सुरू झाले आहे. राष्ट्रीय कृषी विकास योजनेत महाबीजकडून 52 हजार 366 किलो बियाणे शेतकऱ्यांना करण्यात आले आहे, तर गाळपीक पेरा जमिनीसाठी 15 हजार किलो बियाणे वाटप झाले असून, 725 हेक्‍टर या क्षेत्रातून 22 हजार 750 टन चारा उत्पादन अपेक्षित आहे. 

आठ लाख 94 हजार टन उपलब्धतता 
जिल्ह्यात लहान-मोठे मिळून सात लाख 22 हजार 413 पशुधन आहेत. या जनावरांना दरमहा एक लाख 19 हजार 289 टन चारा लागतो, तर या खरीप हंगामात झालेल्या पेरणीनुसार सात लाख 40 हजार 576 टन चारा उपलब्ध होईल. आजच्या स्थितीत जिल्ह्यात 8 लाख 94 हजार 54 टन चाऱ्याची उपलब्धता आहे. 

चाराटंचाईसाठी उपाययोजना 
चाराटंचाई टाळण्यासाठी उपाययोजना राबविण्यात आल्या आहेत. यात जिल्हा वार्षिक योजनांतर्गत दहा लाख रुपयांचे वैरण बियाणे/ ठोंबे वाटप, कामधेनू दत्तक ग्राम योजनेत सन 2017-18 या वर्षाकरिता अडीच लाख रुपयांचे ठोंबे वाटप आणि सन 2018-19 वर्षाकरिता एक लाख 70 हजारांचे बियाणे वाटप केले. राष्ट्रीय कृषी विकास योजनेत 52 हजार 366 किलो बियाणे वाटप. राष्ट्रीय कृषी विकास योजनेत एक हजार 600 किलो बियाण्यांची जामनेरकरिता अतिरिक्त मागणी करण्यात आली आहे. याशिवाय सद्यःस्थितीला गाळपेरा क्षेत्रात लागवड करण्याचे नियोजन असून, यासाठी 15 हजार किलो बियाणे वाटप झाले आहे. चारा बचतीकरिता राष्ट्रीय कृषी योजनेत 50 टक्के अनुदानावर एक हजार 222 कडबा कुट्‌टीयंत्र वाटप व मुरघास युनिट स्थापना (29 लाख 30 रुपये), 9 लाख 33 हजार रुपयांचे 45 मुरघास युनिट प्रस्तावित आहे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com