जिल्ह्यात पावणेदहा लाख मेट्रिक टन चारा 

जिल्ह्यात पावणेदहा लाख मेट्रिक टन चारा 

जळगाव ः यंदा पाऊस कमी झाल्याने दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे. अशा जनावरांना चाऱ्याचा तुटवडा देखील जाणवण्याची शक्‍यता असून, कृषी विभागाकडील खरीप पीक पेऱ्यानुसार आतापर्यंत जिल्ह्यात 80 टक्‍के चारा उत्पादन म्हणजेच 9 लाख 76 हजार मेट्रिक टन इतका चारा उत्पादित झाला आहे. यामुळे मार्च महिन्यापर्यंत चाऱ्याचा तुटवडा जाणवणार नसल्याचा दावा पशुसंवर्धन विभागाकडून करण्यात आला आहे. 
जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने चाऱ्यांची टंचाई निर्माण होऊ शकते. सध्या तरी जनावरांना मुबलक चारा असला, तरी उन्हाळ्यात पाण्यासोबतच जनावरांसाठी चारा कोठून आणायचा हा प्रश्‍न शेतकऱ्यांसमोर उभा राहणार आहे. जिल्ह्यात असलेल्या एकूण पशुधनांना रोज किमान 4 हजार 391 मेट्रिक टन इतका चारा लागत असतो. त्या दृष्टीने 9 लाख 76 हजार 42 मेट्रिक टन इतका चारा खरीप पीक पेऱ्यातून उत्पादित झाला आहे. म्हणजे हा उत्पादित चारा पुढच्या चार महिने पुरेल इतका असल्याचे पशुसंवर्धन विभागाकडून सांगण्यात आले. 
 
वर्षाला 16 लाख मेट्रिक टन चारा आवश्‍यक 
जिल्ह्यातील पशुधनाची संख्या लक्षात घेतल्यास वर्षभरात 16 लाख 2 हजार 749 मेट्रिक टन इतका चारा लागत असतो. जिल्ह्यात लहान जनावरे 1 लाख 32 हजार 490 व मोठी जनावरे 6 लाख 65 हजार 604 आहेत. या सर्व जनावरांना वर्षाकाठी 16 लाख 2 हजार 749 मेट्रिक टन इतका चारा लागत असतो. या तुलनेत 9 लाख 76 हजार 42 मेट्रिक टन इतका चारा उत्पादित झाला आहे. 

जिल्ह्यासाठी 55 लाख निधी 
जिल्ह्यात संभाव्य चाराटंचाईची तीव्रता कमी करण्यासाठी राष्ट्रीय कृषी योजनेंतर्गत 55 लाख 48 हजार 980 इतका निधी उपलब्ध झाला आहे. या निधीतून टंचाईग्रस्त तालुक्‍यातील सिंचन सुविधा उपलब्ध असलेल्या पशुपालक किंवा शेतकऱ्यांना वैरण बियाणे व खते वितरित करण्यात येत आहेत. यात प्रति गुंठ्यासाठी 460 रुपये देण्यात येणार आहे. या अंतर्गत या महिन्यात बियाणे वाटप करण्यात येणार असून, यात मका, ज्वारी हे बियाणे देण्यात येईल. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com