औषध विक्रेत्यांचे उद्या "बंद' आंदोलन 

औषध विक्रेत्यांचे उद्या "बंद' आंदोलन 

जळगाव ः ऑनलाईन फार्मसी विरोधात औषध विक्रेत्यांच्या जिल्हाभरात एक दिवसीय बंद आंदलोन 28 सप्टेंबरला पुकारले आहे. जिल्हाभरातील औषध विक्रेते एकत्र येवून शहरात मोर्चा काढून 
जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देवून एक दिवस बंद आदोलन केले जाणार आहे. 

ऑनलाईन फॉर्मसी खरेदीमुळे रुग्णांवर व समाजावर गंभीर परिणाम होत आहे. तरुण पिढी व्यसनधिनतेकडे वळत आहे. याबाबत अखिल भारतीय केमिस्ट संघटनेतर्फे ई-फार्मसीच्या विरोधात आवाज उठवून ई-फार्मसीची परवानगी शासानाने नागरिकांचे हित लक्षात घेवून ती नाकारावी यासाठी आवाज उठवीला जात आहे. त्यानुसार 28 सप्टेंबरला शुक्रवारी जिल्ह्यातील सर्व औषध विक्रेत्यांचे दुकाने 24 तासांसाठी बंद राहणार आहे. तसेच त्याच दिवशी निषेध मोर्चा हा सकाळी अकरा वाजता खानदेश कॉम्प्लेक्‍स येथून काढून तो जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढला जाईल. जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत पदाधिकारी निवेदन देवून मोर्चाची समाप्ती केली जाणार आहे. 

गरुजूंनी आज औषध खरेदी करा 
शुक्रवारी औषध विक्रेत्यांचा बंद आंदोलन आहे. त्यामुळे गरुजू रुग्णांनी उद्या (ता.27) आवश्‍यक औषधी-गोळ्या खरेदी कराव्या. जेणे करून रुग्णांची गैरसोय होणार नाही असे आवाहन औषधी विक्रेता संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनील भंगाळे यांच्या अन्य पदाधिकाऱ्यांनी केले आहे. 

अत्यावश्‍य व्यवस्था केमिस्ट भवानत 
औषध विक्रेतांचे शुक्रवारी बंद काळात अखिल भारतीय केमिस्ट संघटनेतर्फे अत्यावश्‍यक औषधी ही केमीस्ट भवन, जिल्हापेठ येथे केली आहे. येथे फक्त औषधींचे व्यवस्था केली असून जनरल औषधी नसणार आहे. 

नियंत्रण कक्षाची स्थापना 
ऑल इंडिया ऑर्गनाईझोशन केमिस्ट ऍण्ड ड्रगिस्ट यांनी 28 सप्टेंबरला देशव्यापी बंद पुकारला आहे. त्यापार्श्‍वभुमीवर अन्न व औषध विभागाच्या सहाय्यक आयुक्त कार्यालयातर्फे नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. बंदच्या काळात या कक्षाद्वारे औषधी मिळतील. सोबतच सर्व सरकारी, निमसरकारी रुग्णालयात पुरेशा प्रमाणात औषध साठा उपलब्ध करण्याबाबत सुचित केलेले आहे. रुग्णांच्या सोईकरिता खाजगी रुग्णालये व वैद्यकीय व्यावसायिकांनी पुरेसा औषध साठा त्यांचेकडे ठेवण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. औषध विक्रेत्यांनी बंदमध्ये सहभागी न होता नेहमीप्रमाणे आपली सेवा अखंडीतपणे चालु ठेवावी जेणेकरुन सर्व सामान्य नागरीक व रुग्णास औषधाचा तुटवडा भासणार नाही. औषध विक्रेत्यांनी औषध दुकाने बंद ठेवल्यास त्यांनी या बंदच्या काळात औषधांसाठी नियंत्रण कक्ष, सहाय्यक आयुक्त यांचे कार्यालय, अन्न व औषध प्रशासन महाराष्ट राज्य, एफ -13 ते एफ -16 पहिला मजला, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्केट जिल्हा पेठ, जळगाव येथे संपर्क साधावा.सोबतच जळगाव शहर - औषध निरीक्षक न.अय्या,2217476, 8888806825, औषध निरीकि बा.कवटीकवार (चाळीसगाव, भडगाव, पाचोरा, जामनेर, भुसावळ, रावेर, मुक्ताईनगर व बोदवड)- -9028866959, निरीक्षक जो.मॅ. चिरमेल (धरणगाव, एरंडोल, पारोळा, चोपडा, अमळनेर, यावल, जळगाव ग्रामीण)-9404629330 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन सहाय्यक आयुक्त वि. ता. जाधव यांनी कळविले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com