जिल्ह्यात बालमृत्यूचे प्रमाण झाले कमी 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 26 मे 2018

जळगाव ः जिल्ह्यात वाढत्या बालमृत्यूचे प्रमाण रोखण्यासाठी जिल्हा आरोग्य विभागाने वेगवेगळे उपक्रम हाती घेत बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्यात यश मिळविले आहे. जिल्ह्यातील बालमृत्यूचा दर 11 वर आला आहे. जिल्ह्यात 2017-18 यावर्षी 556 बालकांचा मृत्यू झाला असून 2016-17 च्या तुलनेत बालमृत्यू 53 ने कमी झाला आहे. 

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागांतर्गत बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी काम करणाऱ्या बालमृत्यू अन्वेषण जिल्हा समितीची बैठक मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी दिवेकर यांच्या अध्यक्षतेखाली आज झाली. या बैठकीचा आढावा सादर करण्यात आला. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी. एस. कमलापूरकर, जिल्हा रुग्णालयाचे डॉ. विजय रायकर, डॉ. मिलिंद बारी, डॉ. सरोदे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. बऱ्हाटे, डॉ. संदीप चौधरी, डॉ. प्रमोद सोनवणे आदी उपस्थित होते. याप्रसंगी जिल्ह्यातील बालमृत्यूचा आढावा घेण्यात आला. यात डॉ. कमलापूरकर यांनी माहिती देताना जिल्ह्यात 2011-12 मध्ये बालमृत्यूचे प्रमाण हे 1 हजार 539 असून, ते 2017-18 मध्ये 556 वर आल्याचे सांगितले. राज्यातील बालमृत्यूचा रेशिओ 20 इतका असून, जिल्ह्यातील हे प्रमाण 11 इतकेच आहे. 
जिल्ह्यात शून्य ते पाच वर्ष वयोगटातील बालकांच्या मृत्यूचे प्रमाण कमी करण्यात आरोग्य विभागाला यश मिळाले आहे. तरी देखील जिल्ह्यातील जामनेर, चाळीसगाव व रावेर या तालुक्‍यांमध्ये बालमृत्यूची संख्या अधिक आहे. यामुळे येथील प्रमाण कमी करण्यासाठी नावीन्यपूर्ण योजनांचा अवलंब करून प्रमाण कमी करण्याच्या सूचना देण्यात आल्या. 

वर्ष................बालमृत्यू 
2011-12......1,539 
2012-13......1,236 
2013-14.......883 
2014-15.......779 
2015-16.......589 
2016-17.......609 
2017-18.......556

Web Title: marathi news jalgaon child death