मुलेही ताण-तणावाच्या फेऱ्यात!

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 13 मे 2018

जळगाव ः परीक्षा आल्या की टेन्शन, परीक्षा संपल्या तरी पुढे काय याचे टेन्शन, शाळा निवडायचे टेन्शन, ऍडमिशनचे टेन्शन; एकंदरीत काय तर करियरचा ताण या साऱ्या वातावरणामुळे आजकाल ज्येष्ठ आणि युवा पिढीसोबतच शाळेत जाणारे मुलेही तणावाखाली वावरत असतात. इतकेच नाही तर जीवघेणी स्पर्धा आणि बदललेली जीवनशैलीने सर्वच जण तणावाखाली जगत आहे. 

जळगाव ः परीक्षा आल्या की टेन्शन, परीक्षा संपल्या तरी पुढे काय याचे टेन्शन, शाळा निवडायचे टेन्शन, ऍडमिशनचे टेन्शन; एकंदरीत काय तर करियरचा ताण या साऱ्या वातावरणामुळे आजकाल ज्येष्ठ आणि युवा पिढीसोबतच शाळेत जाणारे मुलेही तणावाखाली वावरत असतात. इतकेच नाही तर जीवघेणी स्पर्धा आणि बदललेली जीवनशैलीने सर्वच जण तणावाखाली जगत आहे. 
आजची परिस्थिती पाहिली तर खूप बदल होताना पाहण्यास मिळतो. याला कारण म्हणजे "अंथरूण पाहून पाय पसरावे' असे म्हणणारा जमाना गेला असून, आता हौस पूर्ण करण्यासाठी वाट्टेल ते करणारा जमाना आला आहे. यामुळे सभोवतालची परिस्थिती झपाट्याने बदलली. सध्याच्या जीवनशैलीत प्रत्येकजण रोजच्यारोज ताणाला सामोरे जात आहे. सहाजिकच त्याचा परिणाम इतरांवर होतो. ताण आल्याने त्याचा परिणाम आरोग्यावर, क्रयशक्तीवर होतो. म्हणूनच ताणतणावांचे योग्य व्यवस्थापन करणे आवश्‍यक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. 

जीवघेणी स्पर्धा अन्‌ अपेक्षा 
आजच्या युगात प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा सुरू झाली आहे. या स्पर्धेत आपण कसे टिकणार हा विचार डोक्‍यात येतो आणि तडजोड करण्यात अडचणी येतात. यामुळे या जीवघेण्या स्पर्धेत तणावाला सामोरे जावे लागते. तसेच बदललेल्या जीवनशैलीत स्वतःकडच्याच अपेक्षा वाढलेल्या असतात. दुसऱ्याकडे एखादी वस्तू आली म्हणजे आपल्याकडेही हवी, या विचारातून कर्ज काढून अपेक्षांची पूर्तता करण्यात प्रत्येकजण लागला आहे. हेच नाही तर आपली भूमिका आणि नाते यात दुरावा निर्माण झाल्यास देखील तणाव येण्यास कारण ठरते. 

तणावातून आजार 
तणावग्रस्त आयुष्य जगत राहणे ही शरीरासाठी शिक्षा असते. तणावाचे परिणाम हे मानसिकच असतात असे नाही तर शरीरावरही त्याचा परिणाम होत असतो. डोके दुखणे, चक्कर येणे, आहाराच्या सवयी बदलणे, पाठदुखी, ऍलर्जी तसेच सततच्या तणावामुळे कामातून लक्ष उडणे, मन विचलित होणे, कामे पुढे ढकलत जाणे, निष्काळजीपणा, विसरभोळेपणा, एकाग्रता नसणे यासारखे परिणाम जाणवतात. तसेच रक्‍तदाब वाढत असतो. 

आज प्रत्येकजण तणावाखाली जीवन जगत असतो. हा एक मानसिक भाग असतो. पण तणावामुळे पुढचे उद्‌भवणारे आजार टाळण्यासाठी आपल्या अपेक्षा मर्यादित ठेवणे, ध्येयापर्यंत टप्याटप्याने कसे जाता येईल यावर लक्ष केंद्रित करायला हवे. 
 डॉ. नीरज देव, मनोचिकित्सा तज्ज्ञ. 
 

Web Title: marathi news jalgaon child tress